BJP WOMENS.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत वीज वितरणच्या कार्यालयास ठोकले टाळे ...नोटीसा  मागे घ्या अन्यथा कामकाज रोखू : भाजप महिला मोर्चाचे आंदोलन 

बलराज पवार

सांगली-  राज्य शासनाने वाढीव वीज बिले माफ करण्याचे खोटे आश्‍वासन देत आता थेट कनेक्‍शन तोडण्याच्या नोटीसा देऊन जनतेची फसवणूक केली आहे. महाविकास आघाडी सरकार खोटारडे आहे. नोटिसा मागे घाव्यात अन्यथा वीज वितरण कंपनीचे कामकाज रोखण्यात येईल असा इशारा भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा नगरसेविका ऍड. स्वाती शिंदे यांनी दिला. 

भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आज हिराबाग कॉर्नर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला वीज कनेक्‍शन तोडण्याच्या नोटीसा मागे घेण्याच्या मागणीसाठी टाळे ठोकले. या ठिकाणी भाजपा महिला मोर्चाच्या महिलांनी जोरदार निदर्शने केली. महाविकास आघाडी सरकारच्या धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या. 

ऍड. स्वाती शिंदे म्हणाल्या, महाविकास आघाडी सरकार खोटारडे आहे. उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वाढीव विज बिले माफ करण्याचे खोटे आश्वासन जनतेला दिले होते. आता 75 लाख ग्राहकांना विज कनेक्‍शन तोडण्याच्या नोटीसा देवुन महाराष्ट्र अंधारात टाकण्याचे पाप महाविकासआघाडी सरकारने केले आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे लोकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडल्याने लोकांकडे पैसे नाहीत आणि राज्यातील सरकार तिप्पट वीज बिल वसुली करुन सर्वसामान्य लोकांचे खिसे रिकामे करतेय. जर सरकारने विज कनेक्‍शन तोडण्यासाठी दिलेल्या नोटीसा मागे घेवून जनतेला दिलासा दिला नाही तर आम्ही वीज वितरण कंपनी कार्यालयाचे कामकाज होवू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. 

यावेळी ज्योती कांबळे, छाया हाक्के, स्मिता पवार, गंगा तिडके, वैशाली पाटील, सोनाली सागरे, मंगल मोरे, माधुरी वसगडेकर, सुनिता इनामदार, सुस्मिता कुलकर्णी, शैलजा पंडित, गौरी माईनकर, हिना शेख, मनीषा शिंदे, संगीता चव्हाण, वैशाली पडळकर, मनीषा चव्हाण, ललिता कांबळे, मीरा मेस्त्री, निकिता चव्हाण, पूजा सुतार, आशा पवार, वंदना जाधव आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिल्या दोन सामन्यांत संधी नाही, पण आता वैभव सूर्यवंशीची बारी? श्रेयस अय्यरच्या वक्तव्याने समीकरण बदललं; तिसऱ्या T20 मध्ये खेळणार?

Bhandara Tragedy : पती पाठोपाठ एका तासात पत्नीचाही मृत्यू एकाच सरणावर दोघांवरही अंत्यसंस्कार

Solar Panel: 5kW सोलर पॅनलवरून महिन्यात किती युनिट वीज तयार होते? सबसिडी किती मिळते? पाहा संपूर्ण गणित!

Marathi News Live Updates : जरांगेंनी तब्येतीचा काळजी घ्यावी, आंदोलन हिंदु सणात अडथळा ठरेल : मंत्री शेलार

Health: गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी HPV लसीकरणावर भर; NCD मॉडेलमध्ये डिजिटल ट्रॅकिंगचाही समावेश

SCROLL FOR NEXT