lockdown in ahmednagar 
पश्चिम महाराष्ट्र

लॉकडाउन यांच्यापासून दूरच

सकाळ वृत्तसेवा

नगर :  देशात लॉकडाउन जाहीर होऊन एक महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले आहेत. पोलिस व महसूल प्रशासनांकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सोशल डिस्टन्सचा नियम पाळण्याविषयी आवाहन केले आहे. मात्र, उपनगरांतील नागरिक सोशल डिस्टन्सच्या नियमाला हरताळ फासत फिरत आहेत. पोलिसांचे वाहन आल्याचा अंदाज येताच ही मंडळी जिवाच्या आकांताने घरात पळत सुटतात. 

लॉकडाउन लागताच जिल्हा प्रशासनाने शहरात जमावबंदी व संचारबंदी लागू केली. पोलिस शहरात फिरणाऱ्यांवर व शहरात येणाऱ्या रस्त्यांवर उभे राहून वाहनांवर कारवाई करू लागले. शहरात पोलिसांची संख्या कमी असल्याने उपनगरांत त्यांची वाहने किमान एकदा चक्‍कर मारून जाऊ लागली. सुरवातीला काही दिवस उपनगरांतील नागरिकांनी अंदाज घेतला. पोलिसांची वाहने कोणत्या वेळेत येतात, हे पाहून उपनगरांतील नागरिकांचे मॉर्निंग व इव्हिनिंग वॉकचे टायमिंग सेट झाले.

रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांच्या शेड अथवा झाडांच्या सावलीत दुपारी पत्त्यांचे डाव व गप्पांच्या मैफली रंगतात. यात सोशल डिस्टन्सचे नियम कोठेच नसतो. जणू काही कोरोना येथे येणारच नाही, याची या लोकांना खात्रीच असते. अशा स्थितीतही पोलिसांचे वाहन येत असल्याचा सुगावा लागताच हे नागरिक जिवाच्या आकांताने मिळेल त्या घरात व आडोशाला उभे राहून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करतात. यात महिलांची धावपळ झाल्यास मोठा हंशाही पिकतो. महापालिका प्रशासनाच्या घंटागाड्या केवळ सोशल डिस्टन्सचे आवाहन नागरिकांना करत आहेत. त्याचे पालन मात्र नागरिक करताना दिसत नाहीत. 


शहरातील गस्ती पथकातील पोलिसांची संख्या 600 
महसूल कर्मचारी संख्या 15 
शहराची लोकसंख्या सुमारे 5 लाख 

फिरण्याच्या वेळा 
पहाटे पाच ते सात 
सायंकाळी साडेपाच ते सात व रात्री 9 ते 10 

येथे लॉकडाउन पाळला जात नाही 
वडगाव गुप्ता रस्ता, कॉटेज कॉर्नर परिसर, एमआयडीसी परिसर, कल्याण रस्ता, शासकीय तंत्रनिकेतन रस्ता, भवानीनगर, सारसनगर, स्टेशन रस्ता, आगरकर मळा, विरंगुळा मैदान, केडगावमधील भूषणनगर, आदर्शनगर, सावेडी उपनगरातील नित्यसेवा, निर्मलनगर, श्रमिकनगर आदी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, Video: बुमराह आला अन् दुसऱ्याच बॉलवर विकेट घेतली! भुवनेश्वर कुमारच्या पंक्तीत मिळवलं स्थान

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? सौदीची पाइपलाइन बंद, फक्त ५ ते ७ दिवसांचा तेलसाठा शिल्लक

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

SCROLL FOR NEXT