baby grabbed the hook from the inside case in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

 बाळाने लावून घेतली आतून कडी, आणी सर्वांच्याच काळजाचा ठोका वाढला ..

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : लहान मुल कधी काय करतील याचा नेम नसतो मात्र अनेकदा लहान मुलांनी केलेल्या एखाद्या चुकीमुळे कुटुंबाला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतो याचेच प्रत्यंतर बेळगाव शहरात रविवारी पहावयास मिळाले असुन अडीच, वर्षाच्या मुलाने दरवाज्याची कडी आतुन लावुन घेतल्याने आत जाण्यासाठी दरवाजा कापुन कडी काढण्याची वेळ पालकांवर आली मात्र या प्रकारामुळे लहान बाळ आणी त्याचे कुटुंबिय चांगलेच घाबरुन गेले होते. 


मंडोळी रोड, टिळकवाडी येथील एका कुंटुबातील अडीच वर्षाच्या बालकाने दरवाज्याची आतुन कडी लावुन घेतली व कडी लावुन घेतल्यानंतर खोलीत कोणीही नसल्याने घाबरुन बाळ जोरजोरात रडु लागले हे पाहुन आईला बाळ का रडतेय याची कल्पना येईना मात्र दरवाज्याची कडी बाळाने आतुन लावुन घेतल्याचे दिसुन येताच आईला काय करावे हे सुचत नव्हते तर दुसरीकडे बाळ जोरात रडत असल्याने दोघांचीही घाळमेळ सुरु झाली होती.

पालकांनी लक्ष देणे ​गरजेचे...

कडी काढल्याशिवाय खोलीत शिरता येत नसल्याने दरवाजा तोडुन किंवा इतर प्रकारे कडी काढण्याचा प्रयत्न करणे आवश्‍यक होते. त्यामुळे त्यांनी घराशेजारी राहणारे माजी नगरसेवक पंढरी परब यांना माहिती दिली त्यानंतर अनेकदा आवाज देऊन बाळाला कडी काढ असे सांगण्यात आले मात्र बाळाला कढी काढता येत नव्हती त्यामुळे अति रडुन बाळाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी परब यांनी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना सांगुन कडी काढण्यासाठी मशिनव्दारे दरवाचा कापण्यास सांगितले त्यांनतर कडी काढण्यात आली त्यामुळे आईसह सर्वांनीच सुटकेचा निश्‍वास सोडला 
अनेकदा लहान मुले आतुन कडी लावुन घेतात त्यामुळे त्रास होतो याकडे पालकांनी लक्ष देणे आवश्‍यक आहे असे मत या प्रकारानंतर व्यक्‍त झाले. 

आई वडील जे काही करीत असतात त्याकडे पालकांचे बारीक लक्ष असते त्यामुळे लहान मुले कोणत्याही प्रकारची चुक करणार नाहीत याकडे पालकांनी लक्ष देणे आवश्‍यक आहे. लहान मुले आतुन कडी लावुन घेणार नाहीत यासाठी कडीला बांधुन ठेवावे किंवा इतर उपाय करावेत त्यामुळे अशा घटना घडणार नाहीत. 
पंधरी परब ,माजी नगरसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट; पुढील दोन दिवसांत निर्णयाची शक्यता, ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार?

Weekly Horoscope: १४ ते २० सप्टेंबरचा आठवडा ठरणार खास! या राशींना मिळणार पैसा, करिअरमध्ये संधी आणि प्रेमात सुख

Koyna Dam : सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग

Marathi News Live Updates : वरंधा घाटात मध्यरात्री दोन कारची समोरासमोर धडक, तिघे गंभीर जखमी

Ratnagiri CNG: ऐन गणेशोत्सवात सीएनजीचा ठणठणाट; रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वरात रांगा; चाकरमानीसह रिक्षाचालक त्रस्त

SCROLL FOR NEXT