mobile education.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

बाळा मी तुला कुठला देऊ मोबाइल..पोट भरायंची झाली पंचायत

दिलीप क्षीरसागर

कामेरी (सांगली)- बाळा मी तुला कुठला देऊ मोबाइल.....पोट भरायंची ईथं झाली पंचायत..‌.शिक्षण झालं ऑनलाइन पण ग्रामीण भागातल्या बापाची झाली पंचायत. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाउनमुळे. शाळांना मिळाली सुट्टी.. परीक्षा झाल्या बंद मात्र मुलांनी शिक्षणाच्या प्रवाहात राहावे या हेतूने विद्यार्थ्यांना ऑनलाइनच्या माध्यमातून घरातूनच अभ्यास घेण्याचा उपक्रम अनेक शाळांनी सुरू केला सुट्टीचा कालावधी .शिक्षकांनी होमवर्क करावे असेही शासनाने सांगितले शासनाचा हेतू हा चांगला आहे मात्र ग्रामीण भागातल्या मुलांना या ऑनलाईन शिक्षणाचा प्रणालीचा फटका बसला आहे.

ग्रामीण भागात अनेक विद्यार्थ्यांच्या कडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत काही ठिकाणी रेंज नाही मोलमजुरी करणाऱ्या लोकांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल कुटला अँड्रॉइड मोबाईल नसल्याने ही मुले शिक्षणाचे धडे तरी कसे घेणार शिक्षकांनी ऑनलाइन उपक्रम सुरु केला. शाळातील विद्यार्थ्यांचे मोबाईल क्रमांक घेऊन त्यांचे ग्रुप तयार केले आहेत या ग्रुपच्या माध्यमातून हे शिक्षण प्रणाली राबविण्यात येत आहे मात्र ज्यांच्याकडे मोबाईलच नाही अशांची अवस्था वाईट झाली आहे ही अद्यावत शिक्षण प्रणालीग्रामीण भागातल्या तळागाळातील विद्यार्थ्या पर्यंत पोहोचला का हेही पाहणे गरजेचे आहे यापासून अनेक मुलं वंचितच राहिली ज्या मुलांच्या घरातील पालक रोज मोलमजुरी करतात त्यांना कुठला आला अँड्रॉइड मोबाईल मात्र काही मुले पालकांच्या कडे अँड्रॉइड मोबाईल मागू लागले आहेत.

एखाद्या शेजारच्या मुलांकडे मोबाईल तर माझ्यमाकडे का नाही मोबाईल हा न्युनंगंड ही मुलांच्यात निर्माण होवू शकतो जर मिळाल्याचं मुलांना मोबाईल तर मग या मोबाईल चं व्यस्नही लागू शकते मग ते लवकर सुटेल नाही. घरातच खायला नाही पोटभर भाकर मग कुठून देणार आपल्या पाल्यासाठी मोबाईल. मात्र ही प्रणाली इंग्रजी माध्यमाची शाळांना मात्र प्रभावीपणे लाभदायी ठरली आहे.

ऑनलाइन अभ्यासक्रम हा शासनाचा उपक्रम स्तुत्य आहे मात्र विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल दिल्यानंतर पालकांची जागरूकता असणे महत्वाचे आहे मोबाईल हे दुधारी शस्त्र असून त्याचा योग्य वापर झाला पाहिजे नेटवर्किंगमुळे मुले अभ्यासक्रमातच सक्रिय आहेत का इतर कुठे भरकटत गेली हेही पाहणे गरजेचे आहे .याच बरोबर दूरदर्शनच्या माध्यमातून शैक्षणिक चायनल सुरू करून अभ्यासक्रम राबवता येईल करता येईल हे ही शासनाने पहावे.

-डॉ. राहुल मोरे मानसोपचार तज्ञ इस्लामपूर.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ceasefire: इस्रायलकडून बेरूतवर मोठा हवाई हल्ला; ८० जणांचा मृत्यू, १०० लोक जखमी, इराणकडून होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांवर बंदी

Shaktipeeth Highway On Raju Shetti : शक्तिपीठ महामार्गाच्या नवीन नकाशाला राजू शेट्टींचा विरोध, सांगली, कोल्हापुरातून पुन्हा आंदोलन पेटणार

MPSC Success Suraiya Desai : संसार सांभाळत स्पर्धा परीक्षेत यश; कोल्हापुरची सुरैया देसाईं महिलांमध्ये राज्यात प्रथम

Pune water supply news: पुण्यात १५ टक्के पाणी कपात टाळण्यासाठी गळती रोखण्याचा महापालिकेचा प्रयत्न; समान पाणी पुरवठा योजना व स्मार्ट मीटरवर भर

Mehkar Lonigavli POCSO Case: लोणी गवळी शाळेत तिसरीतील मुलींचा विनयभंग करणारा मास्तर ग्रामस्थांच्या ताब्यातून पोलिसांच्या स्वाधीन; जिल्ह्यात संतापाची लाट

SCROLL FOR NEXT