Belgaum Crime Sakal Digital
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव: एक महिन्याच्या बाळाच्या अपहरणामुळे डॉक्टरचं बिंग फुटलं; चौकशीत उघड झालं गर्भपाताचं रॅकेट

बैलहोंगल तालुक्यातील एक महिन्याच्या मुलीची बेळगावला ९ जून रोजी विक्री केली जात होती.

महेश काशीद

एक महिन्याच्या मुलीची विक्री बेळगावात केली जात असताना माळमारुती पोलिसांनी कारवाई करून मुलीचे रक्षण केले.

बेळगाव : एक महिन्याच्या बाळाच्या विक्रीचा (Baby Selling Case) पर्दाफाश बेळगावात पोलिसांनी (Belgaum Police) करून पाच जणांना नुकतीच अटक केली आहे. यात बैलहोंगल आणि कित्तूर येथील संशयित आहेत. यात खासगी डॉक्टर (Doctor) व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्यांची या प्रकरणांत चौकशी केल्यानंतर धक्कादायक बाब पुढे आली. गर्भपात, अनैतिक संबंधातील गर्भपात केले जायचे, अशी माहिती पुढे आली आहे. तीन आठवड्यांपासून घटनेची बेळगावसह जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.

बैलहोंगल तालुक्यातील एक महिन्याच्या मुलीची बेळगावला ९ जून रोजी विक्री केली जात होती. माळमारुती पोलिसांनी छापा घालून बालिकेच्या विक्रीसाठी बेळगावला आलेल्या महिलेला अटक केली. मुलीला ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल केले. संशयित महिलेची कसून चौकशी केल्यानंतर तिने एका डॉक्टरासह संशयितांची माहिती दिली. त्यानुसार महादेवी ऊर्फ प्रियंका, डॉ. अब्दुलगफार हुसेनसाब लाडखान (हंचीनाळ, ता. सौंदत्ती, सध्या सोमवार पेठ, कित्तूर), चंदन गिरीमल्लप्पा सुभेदार (तुरकर शिगिहळी, ता. बैलहोंगल), पवित्रा सोमप्पा मडिवाळर (संपगावी, ता. बैलहोंगल) आणि प्रवीण मंजुनाथ मडीवाळर (होसट्टी, ता. धारवाड) याला अटक केली.

आरोप काय?

महिन्याच्या मुलीच्या विक्रीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. मात्र, चौकशीत धक्कादायक माहिती पुढे आली. डॉ. अब्दुलगफार लाडखान याच्या दवाखान्याला परवानगी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असताना कित्तूरला त्यांचा दवाखाना सुरू होता. तसेच दवाखान्यात गर्भपात करण्यात येत होते, असा संशय आहे. गर्भपातानंतर भ्रूण कित्तूरजवळ शेतात पुरले जायचे, असा आरोप आहे. माळमारुती पोलिस ठाण्यात एक महिन्याच्या बालिकेच्या विक्रीचे प्रकरण दाखल केले आहे, तर दुसरी फिर्याद कित्तूर पोलिस ठाण्यात दाखल झाली. कित्तूरमध्ये परवानगी न घेता दवाखाना सुरू केल्याच्या आरोपासह गर्भपातसंदर्भात तक्रारी आहेत.

सत्य काय आहे?

वैद्यकीय पथक, पोलिस आणि फॉरेन्सिक लॅब विभागाच्या अधिकाऱ्यांना कित्तूरजवळ कारवाईत तीन भ्रूण मिळाले आहेत. पथकाच्या हाती लागलेले भ्रूण स्त्री आहे का पुरुष, हे स्पष्ट नाही. प्राथमिक तपासात त्यांचे वय २ ते ४ महिन्यांच्या दरम्यान असल्याचे निदान झाले आहे. बाळाची व्यवस्थित वाढ आठ ते नऊ महिन्यांनी होते. मात्र, कित्तूरमधील भ्रूण दोन ते चार महिन्यांच्या दरम्यान असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून अनैतिक संबंध, १८ वर्षांपूर्वी गरोदर असलेल्यांचे गर्भपात याठिकाणी व्हायचे का, असा संशय आहे. याबाबतचा प्रस्ताव फॉरेन्सिक लॅबला पाठविला आहे. अहवाल आल्यानंतर याबाबत स्पष्टता होणार आहे.

शिशू विक्री प्रकरणात डॉक्टराची चौकशी

एक महिन्याच्या मुलीची विक्री प्रकरणात डॉक्टराची चौकशी सुरू आहे. डॉक्टर किती दिवसांपासून सक्रिय आहेत, गर्भपात, मुलींच्या विक्रीसह अन्य कोणत्या स्वरूपाचे कारनामे चालत असे, डॉक्टराच्या संपर्कात आणखी कोण होते, कोणत्या पध्दतीने धंदा चालायचा, त्याची माहिती कित्तूर पोलिस आणि वैद्यकीय पथकाकडून घेतली जात आहे.

आरोग्य विभाग आणि फॉरेन्सिक लॅबकडून कित्तूरला छापा घालून तीन भ्रूण ताब्यात घेण्यात आले. यात तिन्ही भ्रूण कमी वयातील आहेत. प्राथमिक माहितीनुसार २ ते ४ महिन्यांचे असावे आणि वजन कमी असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गर्भपाताचा संशय आहे. या संदर्भात अहवाल फॉरेन्सिक लॅबला पाठविला आहे. पुढील महिन्यात अहवाल उपलब्ध होणार आहे.
महेश कोणी, जिल्हा आरोग्याधिकारी, बेळगाव

‘त्या’ मुलीने घेतला अखेरचा श्‍वास

एक महिन्याच्या मुलीची विक्री बेळगावात केली जात असताना माळमारुती पोलिसांनी कारवाई करून मुलीचे रक्षण केले. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी तिला दाखल केले. पण, त्याला प्रतिसाद दिला नाही आणि २१ जून रोजी मुलीने अखेरचा श्‍वास घेतला. तिला श्‍वास घेताना त्रास होईल. यातून तिचा मृत्यू झाल्याचे आरोग्य अधिकारी आणि पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

SCROLL FOR NEXT