sangli dcc.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

जिल्हा बॅंकेच्या थकबाकीदार तीन संस्थांच्या लिलावाकडे पाठ 

सकाळवृत्तसेवा

सांगली-  थकीत कर्ज वसुलीसाठी जिल्हा बॅंकेने केन ऍग्रो एनर्जी साखर कारखान्यासह स्वामी रामानंद भारती सहकारी सुतगिरणी तासगाव व खानापूर तालुका को ऑप. स्पिनींग मिल्स विटा या दोन सुतगिरण्यांचा लिलाव जाहीर केला होता. लिलावासाठी निविदा दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या तारखेपर्यंत कोणीही निविदा भरली नाही. त्यामुळे फेर निविदा प्रक्रिया राबवावी लागणार आहे. त्यामुळे फेर लिलावासाठी पुन्हा लाखो रूपयाचा खर्च करावा लागणार आहे. 

जिल्हा बॅंकेचे थकीत कर्ज वसुलीसाठी बडया थकबाकीदार संस्थांवर कारवाई सुरु केली आहे. यापूर्वी जिल्ह्यातील सहा संस्थांचा लिलाव काढण्यात आला होता. त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे बॅंकेनेच त्या संस्था लिलावात खरेदी केल्या आहेत. त्यामुळे बॅंकेचा सुमारे 265 कोटी रूपये एनपीए कमी झाला. लॉकडाउनमध्ये बॅंकेने कर्ज वसुलीची मोहिम स्थगित ठेवली. लॉक डाऊनमध्ये शिथीलता आणल्यानंतर उद्योग धंदे, व्यवसाय सुरु झाले आहेत. त्यामुळे जिल्हा बॅंकेनेही वसुली मोहिम पुन्हा सुरु केली आहे. बॅंकेचा उर्वरीत एनपीए कमी करण्यासाठी बॅंकेने बडया थकबाकीदार संस्थांवर कारवाई सुरु केली आहे.

केन ऍग्रो कारखान्याचे सुमारे 175 कोटींचे कर्ज आहे. बॅंकेने मुल्याकंन केल्यानंतर या कारखान्याची लिलावासाठी 114 कोटी 33 लाख 86 हजार रूपये राखीव किमंत ठेवण्यात आली आहे. तर स्वामी रामानंद भारती सुतगिरणीची 57 कोटी आणि खानापूर तालुका स्पिनींग मिलची 28 कोटी रूपये राखीव किंमत आहे. तिन्ही संस्थांच्या लिलावासाठी बॅंकेने तीन जुलैपर्यंत निविदा दाखल करण्याची मुदत दिली होती. तर सहा जुलै रोजी निवीदा उघडण्यात येणार होती. मात्र लिलावासाठी कोणीही निविदा भरली नाही. त्यामुळे या तिन्ही संस्थांचा फेर लिलाव लवकरच काढला जाईल अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू यांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Bhayandar Paryushan Controversy : भाजप आमदारांचा अजब फतवा! विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्व काळात पालकांना शाळेचा मेसेज, राजकीय वाद पेटला

Indian Army Success Story: शेतकरी कुटुंबातील हर्षची भरारी! वयाच्या २४व्या वर्षी भारतीय सैन्यात लेफ्टनंट; आई गृहिणी, वडील शेतकरी, मुलाची प्रेरणादायी काहाणी

Pune MPSC Student Kidnapping : धक्कादायक! पुण्यात मध्यरात्री MPSC च्या विद्यार्थ्याचे अपहरण; आरोपी काळ्या रंगाच्या गाडीत आले अन्...

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Ahilyanagar Crime: अशीही सावकारकी; दोन कोटी कर्जाचे झाले २२ कोटी, दोघांना अटक

SCROLL FOR NEXT