Back to the paper examination done by the professor in Belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावात प्राध्यापकांनी बारावीच्या पेपर तपासणीकडे फिरवली पाठ....

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : बारावीच्या पेपर तपासणीकडे पर जिल्ह्यातील अनेक प्राध्यापकांनी पाठ फिरविली आहे. तरीही वेळेत पेपर तपासणी पुर्ण होणार आहे. अशी माहिती पदवीपुर्व शिक्षण खात्याने दिली असुन इकॉनॉमिक्‍स, पॉलिटीकल सायन्स विषयांच्या पेपरची तपासणी पुर्ण झाली असुन तर चार दिवसात इतर विषयांच्या पेपरची तपासणी पुर्ण होणार आहे. 


मार्च महिन्यात बारावीची परीक्षा झाली मात्र कोरोनाच्या संकटामुळे इंग्रजी विषयाचा पेपर पुढे ढकलण्यात आल्याने परीक्षा कधी पुर्ण होणार याची चिंता विद्यार्थ्यांना लागुन राहिली होती मात्र शिक्षण खात्याने 18 जुन रोजी इंग्रजी विषयाच्या पेपरची तयारी करीत आहेत तर दुसरीकडे पदवीपुर्व शिक्षण खात्याने निकाल वेळेत लागावा यासाठी पेपर तपासणीचे काम लवकर पुर्ण करण्याच्या सुचना केल्या आहेत. त्यानुसार बेळगावसह राज्यातील विविध पेपर तपासणी केंद्रावर पेपर तपासणीचे काम हाती घेण्यात आले आहे. 


पेपर तपासणीचे काम सुरु झाल्यापासुन कोरोनाच्या भितीमुळे अनेक प्राध्यापकांनी पेपर तपासणीकडे पाठ फिरविली होती. तसेच पहिले दोन तिन दिवस पेपर तपासणीसाठी फक्‍त 25 टक्‍केच प्राध्यापक उपस्थित होते. मात्र अनुपस्थितीत असलेल्या प्राध्यापकांना पेपर तपासणीसाठी हजर राहण्याचे सातत्याने आवाहन करण्यात आल्यानंतर 60 टक्‍के प्राध्यापक पेपर तपासणीसाठी हजर झाले आहेत. 


पेपर तपासणीसाठी प्राध्यापक कमी संख्येने उपस्थित असले तरी वेळेत नियोजित वेळेत पेपर तपासणीचे काम पुर्ण होणार असुन चार दिवसात पेपर तपासणीचे काम पुर्ण होईल असा विश्‍वास शिक्षण खात्याने व्यक्‍त केला आहे. इंग्रजी विषयाचा पेपर झाल्यानंतर दोन दिवसात इंग्रजी विषयाच्या पेपर तपासणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे जुलै, महिन्याच्या पहिल्या आठवड्‌यात बारावीचा निकाल जाहीर करण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT