पश्चिम महाराष्ट्र

रेल्वे आरक्षण केंद्रांबाहेरील एजंटांसाठी 'बॅड न्यूज' 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : आरक्षण केंद्राबाहेर थांबून गरज नसताना तिकीट काढून ज्यादा पैसे घेऊन प्रवाशांना तिकीटे विकणाऱ्या एजंटांवर कारवाईचे निर्देश रेल्वे प्रशासनाने दिले आहेत. मध्य रेल्वे विभागाने विशेष पथकांची नियुक्‍ती केली असून त्यामध्ये आरपीएफचे जवान व तिकीट तपासणीसांचा समावेश करण्यात आला आहे. गर्दीच्या कालावधीत एजंटांच्या टोळ्यांकडून प्रवाशांची लूट होऊ नये या हेतूने 26 जानेवारीपर्यंत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. 

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील शिर्डी, नगर, कोपरगाव, दौण्ड, कुर्डूवाडी, पंढरपूर, सोलापूर, लातूर, वाडी, कलबुर्गी, बेलापूर या रेल्वे स्थानकांवरील तिकीट आरक्षण केंद्रांसाठी विशेष पथकांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. सोलापूर विभागातील 616 तिकीट तपासणीसांपैकी सुमारे 100 तिकीट तपासणीसांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. तर आरपीएफ जवानांनाही एजंटांवरील कारवाईत तिकीट तपासणीसांना सहकार्य करण्याचे निर्देश सुरक्षा आयुक्‍त मिथुन सोनी यांनी दिले आहेत. तिकीट आरक्षण केंद्रांवर अचानक धाडी टाकल्या जात असून कारवाई गुपीत ठेवली जात आहे. एप्रिल ते डिसेंबर 2019 या कालावधीत मध्य रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून सुमारे 700 कोटींचा दंड वसूल केल्याचे रेल्वेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. 

ठळक बाबी... 

  • एप्रिल ते डिसेंबर या काळात फुकट्या प्रवाशांना केला 155.14 कोटींचा दंड 
  • प्रवाशांकडील तिकीट तपासणीसाठी 657 तिकीट तपासणींची गरज : प्रत्यक्षात 616 तिकीट तपासणीस 
  • सोलापूर विभागातील 11 मोठ्या रेल्वे स्थानकांवरील तिकीट आरक्षण केंद्रांबाहेर विशेष पथकांची नजर 
  • 26 जानेवारीपर्यंत विशेष मोहीम : सरपराईज भेट अन्‌ छुप्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून एजंटांवर लक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: रुपाली चाकणकर यांचा अखेर राजीनामा! राजीनाम्याचं कारण काय सांगितलं?

धर्मांतर कायद्यानंतर आता UCC! महाराष्ट्रात समान नागरी संहिता लागू करणार? विवाह, वारसा, घटस्फोट नियमांमध्ये होणार बदल

Ashok Kharat: ''अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर घडलेला प्रकार गंभीर...'', आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

अमरावतीत स्वच्छतेचा बोजवारा; कंत्राटदार नियुक्तीच्या प्रक्रियेला खीळ; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या तलवारी म्यान

Latest Marathi News Update: राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT