शेत तळे भरपाई 
पश्चिम महाराष्ट्र

शेततळ्याला निकृष्ट कागद, लाखाची भरपाई

सकाळवृत्तसेवा

सांगली : शेततळ्यासाठी लागणारा प्लॅस्टिकचा कागद निकृष्ट दर्जाचा देवून ग्राहकाला सदोष सेवा दिल्याबद्दल हरिओम इंडस्ट्रीज व हरिओम प्लॅस्टिक यांनी एक लाख 10 हजार रुपये भरपाई म्हणून तक्रारदाराला देण्याचे आदेश सांगलीच्या ग्राहक न्यायालयाने दिले. मुकुंद दाते यांच्या अध्यक्षतेखालील अश्‍फाक नायकवडी व श्रीमती निलांबरी देशमुख यांच्या पीठाने निर्णय दिला. ऍड. प्रदीप जाधव व ऍड. बाबासाहेब पाटील यांनी तक्रारदारांतर्फे काम पाहिले.

हरेराम दादू जाधव (दहीवडी, ता. तासगाव) यांची दहीवडी येथे शेतजमीन आहे. त्यांनी त्यांच्या शेततळ्यासाठी 90 रुपये चौरस मीटर प्रमाणे 11 हजार मीटर कागद 99 हजार 342 रुपये देवून मे 2017 मध्ये खरेदी केला. त्या पेपरला पाच वर्षांची हमी होती.

काही दिवसांतच त्या शेततळ्यातील पाणी आपोआप कमी होत असल्याचे निदर्शनास आले. श्री. जाधव यांनी कंपनी व वितरकाकडे तक्रार केली. कंपनीने भरपाई न दिल्याने जाधव यांनी सुरुवातीला वकीलामार्फत नोटीस दिली. तरीही कंपनीने कार्यवाही न केल्याने जाधव यांनी ग्राहक न्यायालयात तक्रार दिली. 

हरिओम फ्लेक्‍झिपॅक इंडस्ट्रीज (अंबक फाटा, ता. हातकणंगले), हरिओम प्लॅस्टिकतर्फे अरुण शिंदे व रवींद्र शिंदे यांना प्रतिवादी करण्यात आले. हरिओम फ्लेक्‍झिपॅक इंडस्ट्रीज व हरिओम प्लॅस्टिक यांनी 15 दिवसांत तक्रारदारास नवीन प्लॅस्टिक कागद द्यावा. तसे न केल्यास त्यांनी तक्रारदारास 30 दिवसांत 99 हजार 342 रुपये द्यावेत. शारीरिक व मानसिक त्रासापोटी 5 हजार रुपये व अर्जाचा खर्च म्हणून 5 हजार रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT