download (3).jpg
download (3).jpg 
पश्चिम महाराष्ट्र

बहुजन तरुणाला  संधी जयंतरावांना झोंबली 

नागेश गायकवाड

आटपाडी (सांगली) ः जयंतरावांना माझी उमेदवारी खूपच झोंबली. त्यातून त्यांची बहुजन समाजाबद्दलची मानसिकताच उघड झाल्याचा आरोप भाजपचे नुतन विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाल्यानंतरही झालेल्या पडद्यामागच्या राजकारणावर भाष्य करताना त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला लक्ष्य केले. 

ते म्हणाले,"" बहुजन समाजातील एका कार्यकर्त्याला भाजपने संधी दिली हेच राज्यातील प्रस्थापित नेतेमंडळींना झोंबले आहे. त्यामुळे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दोन दिवस पूर्ण ताकद आणि पदाचा गैरवापर करून माझ्याविरोधातील कागदपत्रे-पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला. यासाठी संपुर्ण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षच कामाला जुंपला होता. त्यांनी माझ्या नव्हे तर बहुजन समाजाच्या उमेदवारीला विरोध करून आपला खरा चेहरा दाखवला आहे.

अर्जाच्या छाननी दिवशी शशिकांत शिंदे यांना पुढे करून कारस्थान रचले. उमेदवारी अर्जात विटा पोलीस ठाण्यात माझ्यावर दाखल असलेले गुन्हे लपविले आहेत, असा आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांसमोर घेतला. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. समाजकारण आणि राजकारण करताना माझ्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.

यातील अनेक गुन्ह्यांमधून मी निर्दोष सुटलो आहे. जयंतरावांनी पूर्ण माहिती न घेताच उमेदवारीला आक्षेप घेतला. तथापि देवेंद्र फडवणीस आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी तात्काळ कायदेशीर मदत देत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर स्पष्टीकरण केले. अधिकाऱ्यांनी माझा अर्ज मंजूर केला.'' 

कारस्थान सुरुच 
श्री. प उमेदवारीच्या माध्यमातून संबंध बहुजन समाजाला विरोध केला आहे. ही मंडळी एवढ्यावरच थांबली नसून शशिकांत शिंदे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे माझ्या उमेदवारी अर्जाच्या प्रमाणित प्रती मागून न्यायालयात जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या मागे जयंतराव पाटील, गृहमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील मोठे नेते आहेत. मी यावर सविस्तर बोलणार आहे. प्रस्थापितांचे कारस्थान उघड करु.'' डळकर म्हणाले,"" बहुजन समाजातील तरुणाला भाजपने संधी दिली हेच मुळात राष्ट्रवादीतील प्रस्थापित नेतेमंडळींना रुचलेले नाही. त्यामुळेच त्यांनी माझ्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT