balasaheb thorat.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

बाळासाहेब थोरात म्हणाले..मला काय विचारता, मी पाहुणा

सकाळवृत्तसेवा

कडेगाव (सांगली)-आम्ही नाही तर मग कुणीच नाही हा सांगली येथील कॉंग्रेसमधील ट्रेंड घातक आहे, असा टोला शरद पवार यांनी काल कॉंग्रेसमधील अंतर्गत गटबाजीवर लगावला होता. याबाबत आज महसूलमंत्री व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना येथे पत्रकारांनी छेडले असता, त्यांनी हे मला काय विचारताय, मी तर पाहुणा आहे, असे सांगत हात वर केले. 


काल मिरज येथे झालेल्या एका कार्यक्रमात शरद पवार यांनी सांगली विधानसभा मतदारसंघात झालेल्या गटबाजीवर पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या वारसांचे नाव न घेता टोलेबाजी केली होती. सांगली येथे या ट्रेंडमुळेच कॉंग्रेसच्या पृथ्वीराज पाटील यांचा निसटता पराभव झाला. तसेच येथे कॉंग्रेस,राष्ट्रवादी एकदिलाने लढली का,याबाबत मी सविस्तरपणे बोलणार नाही पण परंतु कार्यकर्त्यानी मला नेमके काय म्हणायचे आहे ते समजून घ्यावे, असा टोला लगावला होता.

जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनीही सांगलीत पृथ्वीराज पाटील यांच्या पाठीशी कॉंग्रेस, राष्ट्रवादीची संपूर्ण ताकद लावली असती व सर्वानी एकत्र येवून ताकदीने काम केले असते तर वेगळे चित्र दिसले असते, असे वक्तव्य केले होते. 


याबाबत आज कडेगाव येथे महसूल मंत्री व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे आज सकाळी कडेगाव येथे महसुल विभागाच्या आढावा बैठकीसाठी आले होते. त्यावेळी पत्रकारांनी छेडले असता थोरात म्हणाले, ""हा सांगली येथील विषय असल्याने सांगलीवाल्यानी मला याबाबत कशाला विचारावे. पाहुण्यांना विचारावयाचा हा प्रश्न आहे काय?'' 


बाळासाहेब थोरात हे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. सांगलीतील कॉंग्रेस अंतर्गत गटबाजी नेहमीच कॉंग्रेससाठी डोकेदुखी ठरली आहे. त्यावर थेट शरद पवार यांनी विधान केले, तेही कॉंग्रेसच्या व्यासपीठावरून. त्यामुळे हा विषय कॉंग्रेससाठी "पाहुणे' म्हणून हलक्‍यात घेण्यासारखा नक्कीच नाही. त्यातही प्रदेशाध्यक्षांनी तर नाहीच नाही. त्यामुळे थोरातांनी हात वर केले असले तरी भविष्यात त्यांना या विषयात लक्ष घालावे लागणार आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर कायम, 'या' जिल्ह्यांवर अतिवृष्टीचे मोठे संकट; हवामान विभागाने जारी केला अलर्ट

Paithan Accident: पेट्रोल भरण्यासाठी कार वळवली, पण क्षणात काळाचा घाला; पाचोडजवळ कंटेनरच्या धडकेत दोघे ठार, एक जण गंभीर

करकायदा : रिट्स, इन्व्हिट्सवरील लाभांश करमुक्त

स्मार्ट माहिती : आयटी व्यवस्थापन आणि गुंतवणूकदार यांच्यात दरी

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पत्राने कोंडी फुटली; झारखंडमध्ये सरकार-विद्यार्थी आंदोलकांमध्ये आज निर्णायक चर्चा

SCROLL FOR NEXT