Balu Bandu Mali and Malan handicap couple home dream story sangli marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

 कोणी घर देता का घर दिव्यांग दाम्पत्यांना घरकुलाची आस  

शिवाजीराव चौगुले

सांगली : आधाराला मुलगा नाही. कष्टाला शरीर आणि अपंगत्व साथ देत नाही. हक्काचा निवारच कोसळलाय. आर्थिक परिस्थिती नाही. रात्री घरात झोपलं तर आभाळ दिसतंय.चंद्राच्या प्रकाशानं सारं घर उजाळतय. घराचा उर्वरित भाग अंगावर कधी कोसळलं यामुळे रात्रंदिवस डोळ्याला डोळा लागत नाही. कायम जीव मुठीत घेऊन पडक्या घरात राहून एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्यावर कोणी घर देता का घर असे म्हणण्याची वेळ आली आहे. ही कहाणी आहे खेड( ता. शिराळा ) येथील बाळू बंडू माळी व मालन या दिव्यांग दाम्पत्याची.
 

लहानपणापासून बाळू यांना डाव्या पायाला पोलिओ आहे तर पत्नी मालन तिच्या हाताला भाजल्याने वीस वर्षापूर्वी तिचा उजवा हात खांद्यापासून काढण्यात आला. त्यामुळे पती पायाने तर पत्नी हाताने अपंग आहे.  त्यांना तीन मुली आहेत.त्या ही विवाहित आहेत. त्यांच्या घराची भिंत २०१९ ला झालेल्या अतिवृष्टी मध्ये पडली. त्यांनी ग्रामपंचायतकडे आर्थिक भरपाई ऐवजी घरकुलाची मागणी केली.  घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असल्याने त्यातच घरात त्यांना आपला संसार करावा लागत आहे.

दोन वर्षे झाली. अद्याप त्यांना घरकुल मंजूर झालेले नाही. बाळूचे वय ७१  व मालनचे ६५ वय  असून  पदरी असणारे अपंगत्व  व वयोवृद्ध झाल्याने शारीरिक श्रमाची कामे होत नाहीत.  जमीन एक एकर पण तीही कोरडवाहू . शेती जमत नसल्याने वाट्याने दिली आहे. त्यामुळे पै पाहुणे व  रेशनच्या मिळणाऱ्या  धान्यावर उदरनिर्वाह सुरू आहे.  त्यांना घरकुल मिळावी म्हणून शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे पण तो अद्याप मंजूर झालेला नाही


शिराळा तालुका हा अतिपावसाचा तालुका आहे. यावर्षी पुन्हा पावसाळा सुरू झाल्यास घर जमीनदोस्त होण्याची भीती आहे .त्यांना दुसरीकडे राहायला जागा नसल्याने त्यांना घरकुल मंजूर होणे गरजेचे आहे. यासाठी खास बाब म्हणून लोकप्रतिनिधी प्रतिनिधी व  प्रशासनाने लक्ष घालून त्यांना घरकुल देणे गरजेचे आहे.  पायाला पोलिओ असून ही बाळू यांना अजून अपंगत्वाचा दाखल मिळालेला नाही.


माळी यांच्या घरकुलाचा प्रस्ताव आम्ही पाठवला असून त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही.

ग्रामसेविका माधुरी पाटील

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT