पश्चिम महाराष्ट्र

बेळगावात कडक विकेंड लॉकडाऊन; तीन दिवस बॅंक, एटीएम बंद राहणार

जिल्ह्यातील सर्व बँका आणि एटीएमचे व्यवहार बंद ठेवले जाणार

विनायक जाधव

बेळगाव : विकेंड लॉकडाऊनच्या (weekend lockdown) पार्श्वभूमीवर तीन दिवस बॅंक (closed bank and ATM) आणि एटीएम सेवाही बंद असणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. एम. जी. हिरेमठ यांनी याबाबतचा आदेश बजावला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी जिल्हा (belgaum district) प्रशासनाने शुक्रवार (४) पासून ते सोमवारी (७) सकाळी ६ पर्यंत वीकेंड लॉकडाऊन घोषित केला आहे. याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी या काळात जिल्ह्यातील सर्व बँका आणि एटीएमचे व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत.

मागील सप्ताहात देखील जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी विकेंड लॉकडाऊनला दोन दिवस बैंक आणि एटीएम सेवा बंद ठेवण्याचा आदेश बजावला होता. पण या सप्ताहात विकेंड लॉकडाऊन तीन दिवस ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी (४) ते सोमवारी (७) सकाळी सहा वाजेपर्यंत हे लॉकडाऊन असणार आहे. या काळात तीन दिवस बैंक आणि एटीएम देखील बंद ठेवले जाणार आहेत.

तीन दिवस एटीएम बंद राहणार असल्याने गुरुवारीच (३) नागरिकांना बॅंक आणि एटीएम मधून पैसे काढावे लागणार आहेत. त्यामुळे उद्या सर्व एटीएम केंद्रांवर गर्दी होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने शासनाच्या लॉकडाऊन पाठोपाठ जिल्हा प्रशासनाने कडक विकेंड लॉकडाऊनच्या माध्यमातून कोरोना संसर्ग साखळी तोडण्याचा प्रयत्न करीत आहे. कडक लॉकडाऊन केला असतानाही बॅंक आणि एटीएमचे कारण पुढे करीत अनेकजण फिरत होते. त्यामुळे आता हे कारण देखील पुढे करता येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

श्रीविद्या अन् सीमंतमच्या विधी! सामंथाला ओटीभरणीत चाळणीने अंघोळ का घातली? काय आहे परंपरा? Video

Markandeya Parvat Yatra Ban : मार्कंडेय गडावर ऋषीपंचमी यात्रेला यंदाही 'ब्रेक'; भाविकांना केवळ पहिल्या पायरीपर्यंतच प्रवेश, प्रशासनाचा निष्काळजीपणा?

PhonePe Transaction : ‘फोन पे’ व्यवहार अन् कापडाच्या तुकड्याने उघडला पाच लाखांच्या चोरीचा सुगावा!, कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT