Bapu's support decieded, Raju Dada's brass exposes
Bapu's support decieded, Raju Dada's brass exposes 
पश्चिम महाराष्ट्र

ब्रेकिंग : बापूसमर्थकांचं ठरलं, राजूदादांचं पितळ उघडं पाडायचं 

संजय आ. काटे

श्रीगोदे : नागवडे कारखाना निवडणूकीत सत्ताधारी नागवडे गटातच फुटीची चिन्हे आहेत. अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्याविरोधात "बापू' निष्ठावंत एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर दौंडला उपाध्यक्ष केशव मगर यांनी बोलाविलेल्या बैठकीला प्रमुखांनी हजेरी लावली. मतदार यादीतून सभासद वगळण्याच्या निर्णयाविरोधात हरकती घेतानाच अध्यक्षांचा कारभार सभासदांच्या समोर आणण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे. 

एकतर्फी निवडणुकीची शक्‍यता मावळली 
एप्रिल महिन्यात होणाऱ्या कारखाना निवडणूक एकतर्फी होईल या जाणकांनी बांधलेला अंदाज सध्या तरी चुकीचा होईल, अशी शक्‍यता आहे. विधानसभा निवडणूकीत राजेंद्र नागवडे यांनी भाजपात प्रवेश करीत शिवाजीराव नागवडे यांचे कट्टर विरोधक माजीमंत्री बबनराव पाचपुते यांच्या विजयासाठी सारथ्य केले. कारखाना निवडणूकीत पाचपुते हेच विरोधक आहेत. मात्र, आता पाचपुते व नागवडेच एक झाल्याने कारखाना निवडणूक एकतर्फी होईल असे वाटत होते. 

दौंडमध्ये झाली बैठक 
दरम्यानच्या काळात राज्यात भाजपाची नव्हे तर महायुतीच्या आघाडीची सत्ता आल्याने नागवडे यांच्यासमोर पेच झाला. त्यातच कारखान्यात त्यांच्यासोबत असणारे अनेक महत्वाचे नेते नाराज झाल्याचे समोर आले. त्यामुळे निवडणूक रंगणार अशीच शक्‍यता वाढली आहे. काल सोमवारी दौंड येथे कारखाना उपाध्यक्ष मगर यांनी महत्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. समजलेल्या माहितीनूसार राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार, अण्णा शेलार, जिजाबापू शिंदे, कैलास पाचपुते, बाळासाहेब गिरमकर यांच्यासह प्रमुख उपस्थितीत होते. 

निष्ठावंतांना डावलण्याचा प्रयत्न 
बैठकीत नागवडे यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात आली. बापूंच्या निष्ठावंतांना जाणीवपूर्वक बाजूला काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. सहकारी कारखान्याचे खाजगीकरण करण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप बैठकीत झाल्याचे समजते. निम्यापेक्षा जास्त सभासदांना मतदार यादीतून वगळण्यामागे अध्यक्ष नागवडे यांचाच डाव आहे. मतदार यातीवर हरकती घेण्यासाठी हे नेते पुढाकार घेणार असल्याचे समजले. दरम्यान आज दुपारी यातील काही नेत्यांनी प्रा. तुकाराम दरेकर यांच्यासोबत बैठक घेतल्याचे समजले. 

कारखान्यात हुकूमशाही 
बापूंनी उभा केलेला कारखाना वाचवा एवढीत भूमिका आहे. सध्या तेथे हुकुमशाही सुरू आहे. बापूंचे सगळे संस्कार केवळ नावापुरते आहेत. आम्ही समविचारी एकत्र येवून निवडणूक करणार आहोत. त्यात सगळ्या पक्षाचे प्रमुख असतील, असा आरोप संचालक अण्णा शेलार यांनी केला. 

बापूंचाच वारसा चालवतोय 
आम्ही कुठल्याही निष्ठावंतावर अन्याय केला नाही करणार नाही. मतदार याद्यांबाबत पत्रव्यवहार केला आहे. सगळ्यांना मतदानाचा अधिकार मिळावा, यासाठी न्यायालयात जावू. बापूंचाच वारसा आम्ही चालवतोय सभासदांना ते माहिती आहे,असे राजेंद्र नागवडे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुरात शतकाच्या उंबरठ्यावर, सीएसके गाठणार का 200 चा टप्पा

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ओडिशातील लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची काँग्रेसकडून यादी जाहीर

SCROLL FOR NEXT