Battis Shirala Nag Panchami 2024  esakal
पश्चिम महाराष्ट्र

Shirala Nag Panchami : नागपंचमीसाठी शिराळा नागरी सज्ज; बंदोबस्ताला तब्बल 650 पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात

Battis Shirala Nag Panchami 2024 : नागपंचमीपूर्वी प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी १५० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

वनविभागातर्फे व्हिडिओ चित्रीकरण, सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच समाज माध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.

शिराळा : येथे शुक्रवारी (ता. ९) होणाऱ्या नागपंचमीची (Battis Shirala Nag Panchami) तयारी पूर्ण झाली आहे. शिराळ्यात येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी शिराळा नागरी सज्ज झाली आहे. प्रशासनाने पोलिस (Police) व वन विभाग अशा ६५० हून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवला आहे. नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने शिराळा शहर व मिरवणूक मार्गासह परिसरातील गावांत संचलन केले.

नागपंचमीपूर्वी प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी १५० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. दहा गस्ती पथके आहेत. वनविभागातर्फे व्हिडिओ चित्रीकरण, सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच समाज माध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. पोलिस प्रशासनाकडून १ पोलिस उपाधीक्षक, पोलिस निरीक्षक ११, सहायक पोलिस निरीक्षक ३७, पोलिस कर्मचारी ४१०, वाहतूक पोलिस कर्मचारी ५०, ध्वनिमापक यंत्र १७, व्हिडिओ कॅमेरे १३, एक दंगलविरोधी पथक, एक घातपातविरोधी पथक, एक श्वान पथक व बॉम्बशोध पथक तैनात करण्यात आले आहे.

शिराळा आगारातर्फे ३० व बाहेरील आगाराच्या अन्य गाड्यांचे नियोजन केले आहे. शिराळा-इस्लामपूर मार्गावर १६, शिराळा-बांबवडे मार्गावर १४, शिराळा-कोडोली व शिराळा वाकुर्डे मार्गावर ३, शिराळा-मणदूर मार्गावर १८ फेऱ्यांचे नियोजन केले आहेत. शिराळा-इस्लामपूर जाणारी वाहतूक शिराळा येथून कापरी, कार्वे, लाडेगावमार्गे व इस्लामपूर अशी जाईल. शिराळा येथे येणारी वाहतूक पेठ नाकामार्गे एकेरी केली आहे. साई मंगल कार्यालय, शिराळा-कोकरूड व बांबवडे मार्गावर विश्वासराव नाईक कॉलेज, वाकुर्डे-शिरशी मार्गावर पाडळी रस्ता येथे तात्पुरते बस स्थानक सुरू केले आहे.

‘महावितरण’ने नागपंचमीला अखंडित विद्युत पुरवठा सुरू राहण्यासाठी पर्यायी फिडरवर खेड फाटा व बिरोबा मंदिर येथे नवीन ए. बी. स्वीच कार्यान्वित केले आहे. शिराळा बसस्थानक, कापरी नाका, अंबामाता मंदिर, मरिमी चौक, नायकुडपुरा, लक्ष्मी चौक, तळीचा कोपरा, नगरपंचायत, गुरुवार पेठ, नवजीवन वसाहत येथे प्रत्येक ठिकाणी आवश्यकतेनुसार १ अभियंता व दोन ते तीन विद्युत कर्मचारी नियुक्त केलेत. आरोग्य विभागातर्फे नगरपंचायत, बसस्थानक, शनिमंदिर, व्यापारी असोसिएशन, समाज मंदिर, नायकूडपुरा, तळीचा कोपरा येथे सात आरोग्य पथके तयार ठेवली आहेत.

सर्पदंशावरील लस उपलब्ध करण्यात आली आहे. खेळणी, खाद्यपदार्थ, पाळणे व मनोरंजनाची अन्य दुकाने दाखल झाली आहेत. वनविभाग (सांगली) यांच्यामार्फत उच्च न्यायालयाचे निर्देशानुसार सापाचे संरक्षणासाठी जनजागृतीसाठी कुंडल विकास प्रशासन व व्यवस्थापन, प्रबोधनी (कुंडल) च्या ५५ प्रशिक्षणार्थी वनक्षेत्रपाल, क्षेत्रीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शिराळा व परिसरातील गावांत संचलन केले. शिराळा शहर, कापरी-कार्वे, लाडेगाव, ऐतवडे बुद्रुक, कुरळप, मरळनाथपूर - रेठरेधरण, गोळेवाडी, नायकलवाडी, ओझर्डे-सुरुल, भटवाडीमार्गे करून शिराळा येथे संचलनाची सांगता केली. वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी, महांतेश बगले व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharanu Hande Case: शरणू हांडेचं अपहरण का झालं? पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत घटनाक्रमच सांगितला!

Mahadevi Elephant : नांदणी गावात महादेवी येत नाही तोपर्यंत झुकेगा नही! काळभैरवनाथ यात्रेबाबत ग्रामपंचायतीने पत्र काढून घेतला मोठा निर्णय

"मला लाज वाटायची" रणबीर कपूरने केला आई-वडिलांच्या नात्याबद्दल खुलासा; "मी रात्रभर पायऱ्यांवर बसून.."

Rahul Gandhi : शपथपत्राचं काय? मी त्यापूर्वीच संविधानाची शपथ घेतली आहे! निवडणूक आयोगाच्या शपथपत्र पाठवण्यावरून संतापले राहुल गांधी....

Sanju Samsonची CSK मध्ये एन्ट्री होत असताना चेन्नईच्या स्टार खेळाडूची Exit! फ्रँचायझीकडे रिलीज करण्याची विनंती; घडतंय बिघडतंय...

SCROLL FOR NEXT