Be careful not to dry out the crops ... 
पश्चिम महाराष्ट्र

पिके वाळणार नाहीत याची खबरदारी घ्या...

शिवाजी चौगुले

शिराळा : कोरोनामुळे वर्षभर अडचणीतून गेलेल्या शेतकऱ्याचा येणारा उन्हाळा तरी सुखकर जावा. पिके पाण्याविना वाळणार नाहीत याची खबरदारी घेऊन अधिकाऱ्यांनी शिराळा-वाळव्यातील शेती पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
 
शिराळा येथील तहसीलदार कार्यालयात वारणेचा मुख्य व डावा कालवा, वाकुर्डे बुद्रुक योजना, मोरणा धरण तसेच सर्व मध्यम प्रकल्पातून शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य प्रकारे वाटप करण्याबाबत पाणी वाटप समितीच्या बैठकीवेळी बोलत होते. तहसीलदार गणेश शिंदे प्रमुख उपस्थित होते. 

श्री. नाईक म्हणाले,""ज्या काळात उपसा सुरू असेल त्या काळात महावितरणने वीज खंडित होणार नाही, याची काळजी घ्यावी. दुरुस्तीची कामे काढू नयेत. मोरणा, शिवाणी, रेठरे धरण, भटवाडी, अंत्री, कार्वे तलाव मार्चपर्यंत भरून घ्यावेत. टाकावे व रेठरे धरण ल. पा. तलाव व शिवणी तलावात असलेल्या सांडव्यातील कालव्याची दुरुस्तीचे प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे सादर करावेत.'' 

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, वारणा डावे कालवा क्रमांक एकचे कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, पाटबंधारे उप विभाग इस्लामपूरचे उप विभागीय अभियंता एल. बी. मोरे, शाखा अभियंता सी. बी. यादव, एस. के. पाटील, महावितरणचे उपअभियंता प्रल्हाद बुचडे, संजय जाधव, सचिन मोहिते, तुकाराम आटूगडे उपस्थित होते. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirgudsar Theft : बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि १५ हजार रुपये रोख रक्कम नेली चोरून

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

Marathi News Live Updates : पुण्यात पाच मानाच्या गणपतीसह प्रमुख गणपती मंडळांची प्राणप्रतिष्ठा

रेल्वेत कुटुंबियांसोबत बसण्यासाठी सीट बदलता येते का? जाणून घ्या रेल्वेचा नियम...

LONG LIFE HOROSCOPE: या’ 6 राशींच्या लोकांना मिळतं दीर्घायुष्याचं वरदान? 100 वर्षांनंतरही राहतात निरोगी, ज्योतिषशास्त्रात काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT