abhijit choudhari.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

सावधान ! नाहीतर रेड झोनमध्ये जाण्याची शक्‍यता...यांनी दिला इशारा 

सकाळवृत्तसेवा

सांगली- जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आल्याने काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. अद्यापही कोरोनाचे संकट गंभीर आहे, याचे भान ठेवून नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे आवश्‍यक आहे. लोकांनी लॉकडाऊन संपल्याचा गैरसमज करून घेऊन ज्या पद्धतीने रस्त्यावर गर्दी केली आहे, त्यातून कोरोनाचा संसर्ग वाढून जिल्हा ऑरेंज झोनमधून रेड झोनमध्ये जाण्याची शक्‍यता अधिक गडद झाली आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग काटेकोर पाळण्याच्या अटींवर मिळालेली सूट देखील आपण गमावून बसू. त्याचा फटका संपूर्ण जिल्हावासीयांना बसेल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी स्पष्ट केले. 

ते म्हणाले, ""राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे प्रशासनाने मार्गदर्शक सूचनांनुसार काही बाबींमध्ये सूट दिली आहे. तथापि बाजार, रस्ते, दुकाने या ठिकाणी लोकांची गर्दी प्रचंड मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. सदरची बाब धोकादायक असून लोकांनी स्वयंशिस्त न पाळल्यास तसेच अनावश्‍यक घराबाहेर पडणे बंद न केल्यास कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक काटेकोरपणे करण्यासाठी ही सूट काढून घेण्यात येईल. मद्यविक्री दुकानांसमोर रांगा व गर्दी निदर्शनास येत आहे. गर्दीच्या नियमनासाठी दुकानदारांनी ग्राहकांना उभे राहण्यासाठी मार्किंग करावे व त्यामध्ये किमान सहा फुटाचे अंतर असावे. ग्राहकांना त्यांच्या ऑर्डर देण्यासाठी एक मागणी पत्राचा नमुना द्यावा. नमुना दिल्यानंतर दुकानदारांनी त्यांना टोकन क्रमांक द्यावा. आठ तासात जास्तीत जास्त चारशे लोकांना सेवा दिली जाऊ शकते. त्यामुळे चारशेच्या पुढे येणाऱ्या ग्राहकांना दुसऱ्या दिवशी सेवा देण्यात येईल.'' 


ते पुढे म्हणाले, ""ग्राहकांमध्ये सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी दुकानदारांनी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी. उत्पादन शुल्क विभागातील जवान सहाय्यक दुय्यम निरीक्षक यांनासुद्धा सोशल डिस्टन्सिंग व गर्दीचे नियंत्रण करण्याकरिता नेमणूक करावी. विभागातील निरीक्षक, दुय्यम निरीक्षक यांना झोनल ऑफिसर म्हणून विशिष्ट भागासाठी तात्काळ नियुक्त करावे. भरारी पथक नेमून या भरारी पथकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन होते किंवा कसे याबाबत आवश्‍यक त्या उपाययोजना कराव्यात. सर्व नियमांचे काटेकोर पालन न झाल्यास मद्यविक्रीसाठी देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात येईल. तसेच ज्या प्रत्येक आस्थापनांना चालू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे अशांनी नियमांचे काटेकोर पालन न केल्यास त्यांचीही परवानगी रद्द करण्यात येईल.'' 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT