KOP20J72426_pr.jpg
KOP20J72426_pr.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

खबरदार ..दुधोंडी  गावात प्रवेश करू नका..

सकाळवृत्तसेवा

दुधोंडी (सांगली) ः येथील परिसरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. नागरिकांमधून भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोग्य विभागासह ग्रामपंचायतीच्या वतीने घरोघरी जाऊन सर्वे करण्याचे काम सुरूच असून अद्याप तीस अहवाल प्रलंबित असल्याची माहिती तंटामुक्त गाव समितीत अध्यक्ष डॉ. नागराज रानमाळे यांनी दिली. 

दुधोंडी येथे गेल्या तीन महिन्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नव्हता. त्यामुळे येथील सर्व व्यवहार नियमांचे तंतोतंत पालन करून सुरूच होते. मागील पंधरा दिवसापूर्वी मुंबईहून आलेल्या दोघांना कोरोणाची लागन झाली. तर 65 वर्षीय राजकीय नेत्याला कोरोणाची लागण झाल्याने या परिसरात कोरोना रुग्णांची संख्या 13 वर गेली आहे.

त्यामुळे दुधोंडी गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. राजकीय नेत्याच्या संपर्कातील जवळपास शंभर जणांची तपासणी केली आहे. अद्यापही तीस अहवाल प्रलंबित आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागासह ग्रामपंचायतीने विविध योजना राबवण्यात आल्या आहेत. कोरोना बाधित परिसर सील करून त्याठिकाणी ग्रामपंचायतीतर्फे औषध फवारणी करण्यात आली आहे.

नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी सर्वे सुरु केला आहे. नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी गोळ्यांचे वाटपही केले आहे. रोगाला प्रतिबंध आळा घालण्यासाठी जवळपास 28 जुलै पर्यंत गावातील सर्व व्यवहार अत्यावश्‍यक सेवा वगळता गावातील सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SSLC Exam Result : दहावी परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर; 'या' वेबसाइटवर पाहू शकता Result

Sakal Podcast: शिरुर लोकसभेसाठी कुणाचं पारडं राहणार जड? ते सोमवारी इस्त्री न केलेले कपडे घालण्याची सूचना

Nagpur Earthquake : नागपूर जिल्ह्यात पुन्हा भूकंप; आठवड्याभरात चौथ्यांदा हादरली जमीन; नागरिक भयभीत

Panchang 9 May : आजच्या दिवशी दत्तगुरुंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT