Bedana exports will be registered online 
पश्चिम महाराष्ट्र

संकटातील शेतकऱ्यांना संधी; बेदाणा निर्यातीची होणार ऑनलाईन नोंदणी 

विष्णू मोहिते

सांगली : केंद्र सरकारच्या क्‍लस्टरमध्ये सांगली, नाशिक जिल्ह्यातील द्राक्षाचा समावेश आहे. द्राक्षाच्या धर्तीवर यंदा सांगली जिल्ह्याचा बेदाणा क्‍लस्टर म्हणून ओळख निर्माण होणार आहे. केंद्र सरकारचे धोरणांतर्गत ऍपेडा आणि राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे ( मांजरी) यांच्या पुढाकारांचे येत्या हंगामापासून बेदाणा निर्यातीसाठी ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे. 

द्राक्ष बागांच्या निर्यात नोंदणीच्या वेळीच त्याच सॉप्टवेअरमध्ये शेतकरी आता बेदाण्याची नोंदणी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. कोरोना संकटात बाजारपेठेच्या शोधात असलेल्या शेतकऱ्यांना एक संधी यामुळे निर्माण होणार आहे. 

सांगली जिल्ह्यात आणि कर्नाटकातील विजापूरपर्यंत पसरलेले प्रचंड द्राक्षबागेचे क्षेत्र विस्तारलेय. द्राक्ष विक्रीला पर्याय म्हणून बेदाणा तयार केला जातो. सन 1980 च्या दशकात भारतात बेदाणा आयात होत असे. सद्यस्थितीत बेदाणा इंडस्ट्री म्हणून मोठी बनतेय. हा आता वर्षभर चालणारा उद्योग झाला आहे. सन 2017 मध्ये वर्षी सांगलीच्या बेदाण्याला जी. आय. मानांकन मिळाले आहे. बेदाणा निर्यातीही होते. यामुळे आणखी मोठी संधी निर्माण होण्याची संधी आहे. द्राक्षा विक्रीऐवजी पर्याय म्हणून बेदाणा निर्मिती सुरू झाली. वर्षाला दीड-दोन लाख टनांहून अधिक उत्पादन आणि 60-70 हजार टन निर्यात असे ठोबळमानाने चित्र आहे. 

सन 2020 च्या द्राक्ष हंगाम सांगतेवर कोरोनाचे संकट ओढवल्याने अनेक उत्पादकांना प्रति किला उत्पादन खर्च 20-22 रुपये नव्हे तर त्यांची विक्री केवळ 5-7 रुपये किलोने करावी लागली. द्राक्ष उद्योगावर संकटाची मालिका गेल्या वर्षी यामुळे अधिक गडद झाली. लॉकडाऊनने केवळ मार्केटींगचीच नव्हे तर निर्यातीच्या द्राक्षापासूनही बेदाण्याचाच पर्याय नाविलाज म्हणून निवडावा लागला. हे ताजे उदाहरण असल्यामुळे यापुढे बेदाण्याची अधिकाधिक बाजारपेठेचा देशांतर्गत विचार करतानाच निर्यातीवरही भर द्यावाच लागणार आहे. 

ऑनलाईन नोंदणी आणि निर्यातीमुळे देशांतर्गत बाजारपेठेतील बेदण्याच्या दरात वाढीला स्थिती पोषक होण्यास मदत होणार आहे. हा निर्णय केवळ सांगली नव्हे तर नाशिकसह, सोलापूर, अहमदनगर, जालना जिल्ह्यात द्राक्षाचा विस्तार सुरु आहे. त्यांनाही याचा फायद्या होईल. दर्जेदार आणि गुणवत्ता पूर्ण, सर्व पोषणमूल्ये असलेला बेदाणा तयार व्हायला हवा. आपल्या शेतकऱ्यांचा खर्च वाढतो आहे. आज जागतिक बाजारपेठ वाढते आहे. त्या बाजारपेठेत आपला बेदाणा जाण्यासाठी संशोधन व्हायला हवे, उत्पादनापासून मार्केटिंग पर्यंत बदल व्हायला हवेत. खर्च कमी करण्यासाठी एखादी अधिकृत संस्था व्हायला हवी आहे. 

एक दृष्टिक्षेप... 
- बेदाण्यात अमेरिका, टर्कीची छाप 
- बेदाणा सल्फर न वापरता सुर्यप्रकाशात वाळवला जातो 
- युरोपमध्ये अमेरिका, नंतर टर्कीचा बेदाणा प्राधान्य 
- तेथे बेदाण्याच्या रंगाऐवजी पोषणमूल्यांवर भर 
- उलट भारतीय बाजारात रंगाला महत्त्व 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT