Indian Railway esakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव-धारवाड रेल्वे मार्गासाठी ९२७ कोटी; शेतकऱ्यांचा मात्र विरोध

पर्यायी मार्गाची मागणी, खासदारांच्या घरासमोर करणार आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : बेळगाव ते व्हाया कित्तूर धारवाड नव्या रेल्वे मार्गाचे भूसंपादन राज्य सरकारने सुरु केले आहे. ९२७ कोटींचा हा प्रकल्प असून ७३ किलोमीटर लांबीचा मार्ग आहे. यासाठी कर्नाटक सरकार रेल्वेला मोफत जमीन देणार असून ५० टक्के प्रकल्पाची किंमत देखील देणार आहे. यामुळे या मार्गाला गती येणार आहे. मात्र, शेतकऱ्यांतून या मार्गाला विरोध होत असून याऐवजी दुसऱ्या मार्गाने रेल्वे मार्ग बनवा अशी मागणी केली जात आहे. यासाठी २१ मार्चला खासदारांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

बेळगावहून देसूर, नंदिहळ्ळी, प्रभुनगर, गर्लगुंजी, नागेरहाळ, बागेवाडी व्हाया कित्तूर ते धारवाड या मार्गे सध्या नियोजित रेल्वे मार्ग आहे. मात्र, या मार्गावर मोठ्या प्रमाणात सुपीक जमिन आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. यासाठी याच मार्गाच्या एक किलोमीटर आसपास असलेल्या व खडकाळ भागातून गेलेल्या जागेतून हा मार्ग बनवावा अशी मागणी शेतकऱ्यांतून जोर धरू लागली आहे. तसेच बिडी, खानापूर, नंदगड, बिडी, कित्तूर, धारवाड हा मार्ग देखील सोयीस्कर आहे. याचाही विचार करावा अशी मागणी शेतकऱ्यांतून करण्यात आली आहे.

हा मार्ग रद्द करावा यासाठी देसूर, नंदीहळ्ळी, गर्लगुंजी, राजहंसगड, नागेनट्टी, केकेकोप्प आदी भागातील ग्रामपंचायतीत ठराव केला आहे. तसेच दुसऱ्या मार्गाचा पर्याय सुचविला आहे. तसेच खासदार इराण्णा कडाडी, आमदार अभय पाटील, आमदार अनिल बेनके, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, संजय पाटील व सरकारला निवेदन दिले आहे. हा मार्ग झाल्यास अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीची नासधूस होणार असल्याने हा मार्ग इतरत्र मार्गाने करावा अशी मागणी करण्यात आली आहे. यासंबंधी खासदारांच्या घरासमोर आंदोलन केले जाणार आहे.

नव्या रेल्वे मार्गाचे भुसंपादन सुरु केले आहे. ९२७ कोटींचा हा प्रकल्प आहे. कर्नाटक सरकार रेल्वेला मोफत जमीन देणार आहे. तसेच ५० टक्के प्रकल्पाची रक्कमही देणार आहे.

-अनिश हेगडे, जनसंपर्क अधिकारी, नैर्ऋत्य रेल्वे

सध्या केला जाणारा मार्ग पिकाऊ जमिनीतून जाणार आहे. यामुळे पर्यायी मार्ग शोधावा. आमचा विकासाला विरोध नाही. मात्र, पिकाऊ जमिनीतून जाणाऱ्या मार्गाला विरोध आहे. यासाठी २१ मार्चला खासदारांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा विचार आहे.

-मारुती लोहार, माजी ता.पं. सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वंदे मातरम्’ला योग्य सन्मानाचं स्थान पुन्हा मिळवून दिलं : अमित शहा

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

Ganesh Chaturthi 2026 : काशीत पेशव्यांनी सुरू केली २२० वर्षांची गणेशपूजा ; काय आहे देशातील दुसऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास ?

मी मुंबईला एकटाच जाणार, २ गाड्या आणि १० लोक सोबत; जरांगेंचा निर्णय, मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

SCROLL FOR NEXT