Court
Court Sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : बायपासची स्थगिती कायम, महामार्ग प्राधिकरण तोंडघशी

मिलिंद देसाई

बेळगाव : हलगा मच्छे बायपासला न्यायालयाने स्थगिती दिलेली असतानाही गुरुवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलांनी बायपासचे काम सुरू करण्यासंदर्भात परवानगी देण्यासाठी न्यायालयात बाजू मांडली मात्र शेतकऱ्यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी महामार्ग प्राधिकरणाचे सर्व दावे खोडून काढल्यामुळे कामाला स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे.

हलगा मच्छे बायपासला शेतकऱ्यांचा पूर्ण विरोध असताना देखील दडपशाहीकरीत काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत कामाला विरोध केला होता. तसेच याबाबत न्यायालयात धाव घेतली होती त्यानंतर न्यायालयाने शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेत झिरो पॉईंट निश्चित केल्याशिवाय बायपासचे काम सुरू कराता येणार नाही असे सांगत कामाला देण्यात आलेली स्थगिती कायम ठेवली होती.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून कामाला विलंब झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत असल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली होती मात्र शेतकऱ्यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी महामार्ग प्राधिकरणाचे सर्व दावे खोडून काढत शेतकऱ्यांवर कशाप्रकारे अन्याय होत आहे हे निदर्शनास आणून दिले होते त्यामुळे कामाला स्थगिती मिळाल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.मात्र पुन्हा एकदा प्राधिकरणाकडून स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत काम बंद झाल्यामुळे नुकसान सहन करावे लागत असल्याचे सातत्याने सांगण्याचा प्रयत्न प्राधिकरणाकडून केला जात आहे.

मात्र न्यायालयाने पुन्हा एकदा कामाला स्थगिती कायम ठेवली आहे. बायपासच्या विरोधात 50 हून अधिक शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच इतर शेतकऱ्यांचाही या कामाला पूर्णपणे विरोध असून कोणत्याही परिस्थितीत काम सुरू होऊ नये अशी अपेक्ष शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. मात्र न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे काम बंद असले तरी प्राधिकरणाकडून विविध प्रकारे काम सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याने शेतकऱ्यांनी सजग राहणे गरजेचे आहे असे मत व्यक्त होत आहे.

बायपासमूळे शहर परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात सुरू होणार असल्याने बायपास रद्द व्हावा यासाठी म ए समितीच्या कार्यकर्त्यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनाही प्रयत्न करा अशी मागणी केली आहे त्यानुसार पवार हे लवकरच रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या बरोबर चर्चा करणार आहेत. त्यामुळे सर्व बाजुनी रस्त्याचे काम बंद व्हावे यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Sharan Singh : आता मी खुला सांड... तिकीट नाकारलेल्या ब्रिजभूषणनं कोणाला दिलं आव्हान?

Bhushan Patil: "शिवरायांचा छावा" फेम अभिनेता भूषण पाटील करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री; म्हणाला, "मी खूप उत्सुक आहे पण..."

Nashik News : मुंढेगावजवळ गोदान एक्सप्रेसच्या चाकाखालून धुर! प्रवाशांनी घाबरून मारल्या उड्या

Yogi Adityanath : पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्यांना भारतात थारा नाही : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

Latest Marathi News Live Update : NEET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना प्रॉक्सी उमेदवार पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT