गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई  Sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई

सुमारे ७ लाख ७५ हजार १३९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या आयशर वाहनांवर कारवाई करून सुमारे ७ लाख ७५ हजार १३९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शुक्रवार (ता.३) सकाळी खानापूर तालुक्यातील कणकुंबी तपासणी नाक्यावर अबकारी खात्याच्यावतीने ही कारवाई करण्यात आली आहे.

आज सकाळी खानापूर तालुक्यातील कणकुंबी तपासणी नाक्यावर अबकारी खात्याच्यावतीने वाहनांची तपासणी करण्यात येत होती. यावेळी केए २२ बी ५६८५ या आयशर वाहनाला थांबवून तपासणी करण्यात आली. त्यावेळी १८० बॉक्स गोवा बनाटीची विविध कंपनीची दारू आढळून आली. त्यामुळे अधिकाऱ्यांनी दत्तात्रय हनुमंत खानापुरे (वय ५५, रा. वडर चाळ खासबाग याला अटक करण्यात आली.

सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीचे आयशर वाहन आणि दोन लाख २५ हजार ११९ रुपये किमतीची दारू असा एकूण सात लाख ७५ हजार १२९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई अबकारी विभागाचे सहआयुक्त सी. के. कुमार अबकारी उपायुक्त जयरामेगौडा एम. डी. अबकारी उपअधीक्षक सी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अबकारी निरीक्षक मंजुनाथ गलगली व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident: 'त्याच' थारवर जाऊन कार कोसळली; ताम्हिणी घाटात पुन्हा तसाच अपघात, एकाचा मृत्यू

Paithan Political : उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात; पैठणच्या राजकारणात उत्सुकता ताणली!

Ranjangaon MIDC Scam : रांजणगाव एमआयडीसीत नोकरीचे आमिष; ४७ तरुण-तरुणींची सत्तर हजारांची फसवणूक; दोघांना अटक!

Cigarette Prices Hike : आधी १० रुपयांना मिळणारी सिगारेट आता किती रुपयांना मिळणार?

Manoj Jarange: 'दहा वाजेपर्यंत MPSCच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवा, नाहीतर...', मनोज जरांगे नदीपात्रात ठाण मांडून, मुख्यमंत्री फोनवरुन बोलणार

SCROLL FOR NEXT