belgaon sakal
पश्चिम महाराष्ट्र

निपाणी : पर्यावरणपूरक गणेशमूर्ती उपक्रमास प्रतिसाद

७०० विद्यार्थांचा सहभाग : शालेय स्तरावर जनजागृती

सकाळ वृत्तसेवा

निपाणी : गणेशोत्सव काळात पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने राबविलेल्या उपक्रमास निपाणी तालुक्यातून शालेय स्तरावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये सहभागी १६ शाळांना प्रत्येकी २ हजार रुपये प्रोत्साहन निधी देण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती होण्यासाठी पहिल्यांदाच हा उपक्रम राबविण्यात आला. त्यात ७०० जणांनी सहभाग घेतला.

गटशिक्षणाधिकारी कार्यक्षेत्रातील विविध गावातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी माती, शाडू, गव्हाचे पीठ, हळद मिश्रणाने पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती बनविण्यात आल्या. कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने राबविलेल्या या उपक्रमाला बेडकिहाळ येथील श्री व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट, निपाणी येथील हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखान्याने अर्थसहाय्य केले. त्यानुसार तालुक्यातील १६ प्राथमिक, माध्यमिक, सरकारी, खासगी शाळांनी सहभाग घेऊन येथील ७०० विद्यार्थ्यांनी श्री गणेश मुर्ती बनविल्या.

शिक्षणाधिकारी रेवती मठद, भारत स्काऊट गाईडचे स्थानिक सचिव टी. बी. लोकरे, रामदास पाटील, सुहास नेपीरे, खवरे यांनी शाळांना भेटी देऊन पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतूक केले.

गटशिक्षणाधिकारी मठद म्हणाल्या, कर्नाटक प्रदूषण नियंत्रण मंडळाने हा उपक्रम राबवून पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य पाऊल उचलले आहे. शिवाय विद्यार्थ्यांच्या कलागुणांनाही वाव मिळाला आहे. दरवर्षी असा उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. उपक्रम राबविण्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगदीश एच. यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

APL 2025: ६,६,६,४,४,४... पी अर्जुन तेंडुलकरचा १२ चेंडूत धुमाकूळ! स्फोटक फलंदाजीनं वेधलं लक्ष

Nashik Crime : अघोरी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नाशिकमध्ये भोंदूबाबावर पोक्सोचा गुन्हा

'पहाटेची वेळ आणि बसमध्ये पुरुषांचे घाणेरडे स्पर्श' भारती सिंहने सांगितला भयंकर अनुभव म्हणाली...'त्याने मला घट्ट पकडलं आणि...'

Rain-Maharashtra Latest Live News Update: मराठवाड्यात मोठी धरणे आणि प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या दिशेने

SCROLL FOR NEXT