अनोळखी वृद्धाचा खून Sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : साधूच्या वेशात वावरणाऱ्या अनोळखी वृद्धाचा खून

नाकातून रक्तस्त्राव झाल्याने खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

रायबाग : साधूच्या वेशात वावरणाऱ्या वृद्धाचा रायबाग तालुक्यातील मुगळखोड शहरात मृत्यू झाला. त्याच्या डोक्याला मार लागला आहे. शिवाय नाकातून रक्तस्त्राव झाल्याने खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. शुक्रवारी (ता. २५) रात्री ही घटना घडली. मयत वृद्ध अनोळखी असल्याची नोंद हारुगेरी पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिस त्याच्या नातेवाईकांसह संशयिताचा शोध घेत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या सहा महिन्यांपासून मुगळखोड शहरात साधूच्या वेशात अनोळखी वृद्ध वावरत होता. तो शहरातील एका बसस्थानकात वास्तव्य करत. याच ठिकाणी आणखी एक जण रहात होता. दोघांमध्ये बसस्थानकात वास्तव्य करण्यावरून बाचाबाची व झटापट झाली. यावेळी डोक्याला मार लागल्याने नाकातून रक्तस्त्राव झाल्याने काल (ता. २५) रात्री बसस्थानकात तो मृतावस्थेत आढळून आला. बसस्थानकात वास्तव्यावरून हा खून झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त होत आहे.

हारूगेरी पोलिसांनी उपनिरीक्षक राघवेंद्र खोत यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. अध्याप मृताची ओळख पटलेली नाही. तसेच संशयिताचा शोध घेण्यात येत आहे. हारुगेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT