Uniform compulsion sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : बारावी परीक्षेसाठीही गणवेश सक्ती, हिजाब वादामुळे निर्णय

दहावी परिक्षेनंतर आता बारावी परीक्षा वेळीही विद्यार्थ्यांना गणवेश सक्ती करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : दहावी परिक्षेनंतर आता बारावी परीक्षा वेळीही विद्यार्थ्यांना गणवेश सक्ती करण्यात आली आहे. तसेच गणवेशा व्यतिरिक्त इतर प्रकारचा पेहराव परिधान करून घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर दाखल करून घेतले जाणार नाही असे शिक्षण खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात हिजाब परिधान करण्यावरून वाद सुरू आहे. तसेच न्यायालयाने देखील सरकारने केलेली गणवेष सक्ती योग्य असल्याचा आदेश बजावला होता. त्यानंतर २८ मार्चपासून सुरू झालेल्या दहावीच्या परिक्षेवेळी हिजाब परिधान करून येण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थांनी गणवेष परिधान करून परीक्षा केंद्रावर पोहचत आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचा गोंधळ होत नसल्याचे दिसून येत आहे. मात्र हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर सर्व परीक्षा केंद्रांवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.

२२ एप्रिल पासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. यावेळी विविध माध्यमाचे लाखो विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार असून या परीक्षेवेळी कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये. या करिता विद्यार्थ्यांना गणवेशची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गणवेष परिधान करून परीक्षा केंद्रांवर यावे लागणार आहे. बारावीची परीक्षेची 22 एप्रिलला सुरूवात होऊन 18 मेला परीक्षेचे सांगता होणार आहे. त्यामुळे या काळात पोलिसांनाही कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची दखल घ्यावी लागणार आहे.

मुस्लिम समाजातील महाविद्यालयीन विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात हिबाब परिधान करतात. मात्र बारावीची परीक्षा अतिशय महत्त्वाची असल्याने विद्यार्थीनिनी इतर गोष्टींकडे लक्ष न देता परीक्षा देणे गरजेचे आहे. असे मत व्यक्त होत आहे.

मिलिंद देसाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT