बेळगाव sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावात तब्बल 59 बहुभाषिकांचे वास्तव्य; आयोगाकडे नोंद

मिलिंद देसाई

बेळगाव : मातृभाषेबद्दल प्रत्येकाला आदर अन् आपुलकी असतेच. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या मातृभाषेचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतो. कोणावरही भाषा लादता येत नाही, असे म्हटले जाते. याचीच प्रचिती आपल्याला बेळगाव जिल्ह्यात दिसून येते. जिल्ह्यात विविध प्रकारच्या तब्बल ५९ भाषेच्या लोक राहत असून त्यांची नोंद भाषिक अल्पसंख्याक आयोगाकडे आहे.

दर दहा वर्षांनी करण्यात येणाऱ्या जनगणनेवेळी लोकसंख्येबरोबरच प्रत्येकाच्या भाषेचीही नोंद केली जाते. बेळगाव जिल्ह्यात कन्नड, मराठी, उर्दू या तीन मुख्य भाषेसह देशाच्या विविध भागातून आलेल्या लोकांनी जनगणनेवेळी आपल्या मातृभाषेची नोंद केली आहे. त्यामध्ये अनेक मराठी भाषिकांना परिचित नसलेल्या विविध भाषांचाही समावेश आहे. बेळगाव जिल्ह्याच्या विविध भागात असामी, बंगाली, डोगरी, हिंदी, अवधी, बंजारी, भोजपुरी, बुंदेली, गढवाली, हरियाणवी, खोरता, कुमाऊनी, लमानी, मारवाडी, मेवारी, पहरी, राजस्थानी, काश्मिरी, कोंकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, नेपाली, ओरिया, पंजाबी, संस्कृत, संथाळी, सिंधी, तमिळ, तेलुगू, अडी, अरेबिक, भिल्लोडी, विष्णूपुरीया, कुर्गी, इंग्रजी, खानदेशी, खारिया, खशी, किनोरी, लडाखी, मिझो, पर्शियन, शीना, तिबेटीयन, तुळू आदी मातृभाषेचे लोक कमी-जास्त संख्येने राहतात. दरम्यान, या विविध भाषिक लोकांनी इतर भाषाही शिकल्या आहेत. बहुतेक जण या मातीशी एकरूप झाले असून त्यांनी आपली मातृभाषाही टिकवून ठेवली आहे.

सीमाभागातील मराठी भाषिकांचे अस्तित्‍व संपविण्यासाठी कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर सातत्याने दडपशाही केली जात आहे. त्यांच्यावर या ना त्या प्रकारे कन्नडसक्ती केली जात आहेत. तरीही येथील मराठी भाषिकांनी आपली मातृभाषा टिकवून ठेवली आहे. सरकारने कितीही प्रयत्न केले तरी कोणाचीही मातृभाषा बदलता येत नाही, हे बेळगाव जिल्ह्यात राहणाऱ्या ५९ विविध भाषेच्या लोकांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांवर विनाकारण कन्नडची सक्ती न करता जिल्‍ह्यात १५ टक्क्यांपेक्षा मराठी भाषिक असल्याने त्यांना त्यांच्या भाषेतून सर्व कागदपत्रे व इतर माहिती द्यावी, असे मत व्यक्त होत आहे.

प्रत्येक जण आपल्या मातृभाषेवर प्रेम करतो. त्यामुळेच जनगणनेवेळी एखादी व्यक्ती कोणत्याही भागात राहत असली तरी आपल्या मातृभाषेची नोंद करतो. बेळगाव जिल्ह्यात विविध उद्योगधंदे आणि व्यवसायानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येऊन राहिले आहेत. त्यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणात विविध भाषेचे लोक या ठिकाणी राहत असल्याचे दिसून आले आहे. मराठी भाषिकांनी नेहमीच आपली मातृभाषा टिकावी, यासाठी संघर्ष कायम ठेवला आहे.

- मालोजी अष्टेकर, माजी महापौर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT