AK-47 Sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : एके-४७ आयटीबीपी केंद्रातून लंपास

हालभावी येथील आयटीबीपी (भारत-तिबेट सीमा सुरक्षा दल) केंद्रातून २ एके-४७ चोरी झाल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

हालभावी येथील आयटीबीपी (भारत-तिबेट सीमा सुरक्षा दल) केंद्रातून २ एके-४७ चोरी झाल्या आहेत.

बेळगाव - हालभावी येथील आयटीबीपी (भारत-तिबेट सीमा सुरक्षा दल) केंद्रातून २ एके-४७ चोरी झाल्या आहेत. त्यामुळे अज्ञात चोरट्या विरोधात काकती पोलिस ठाण्यात आज (ता.१९) गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, प्रकरणानंतर खळबळ उडाली असून, वरिष्ठ अधिकारी पातळीवर तपास सुरु आहे.

हालभावीत आयटीबीपी प्रशिक्षण केंद्र आहे. या केंद्रामध्ये मधुराईतील जवानांची तुकडी प्रशिक्षणासाठी आली आहे. ४८ व्या बटालियन तुकडीसाठी ८ आठवड्याचे विशेष प्रशिक्षण सुरु आहे. तुकडीमधील दोघा जवानांची एके-४७ चोरीला गेली आहे. मंगळवारी (ता.१६) रात्री ते बुधवारी (ता.१७) पहाटे या दरम्यान जवान नेहमीप्रमाणे प्रशिक्षण घेऊन झोपल्यानंतर चोरी घडली आहे.

नक्षलवादी आणि देश सेवेसाठी प्रशिक्षण मिळणाऱ्या केंद्रातून शस्त्रात चोरी झाल्यामुळे खळबळ आहे. पोलिस दल आणि अधिकारी पातळीवर याची जोरदार चर्चा सुरु आहे. यामुळे याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. याशिवाय सुरक्षा व्यवस्था व खबरदारीतील उणिवा उघडकीस आल्या आहेत. यामुळे याविरोधात काकती पोलिस ठाण्यात रेघू कुमार यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस उपायुक्त पी. व्ही. सिन्हा, एसीपी एस. व्ही. गिरीष, पोलिस निरीक्षक आय. एस. गुरुनाथसह सहाय्यक पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अधिकारी व जवानांकडून या घटनेची माहिती घेतली. भारतीय शस्त्रात कायद्याचे उल्लंघन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

केंद्रात तपास आणि चौकशी

हालभावीत आयटीबीपी केंद्र आहे. येथे मधुराई येथून राजेश कुमार व संदीप मिना (मधुराई) जवान प्रशिक्षणासाठी आले आहेत. या केंद्रातून १६ किंवा १७ ऑगस्ट दरम्यान दोन एके-४७ चोरीला गेले आहेत. चोरीची घटना घडण्यापूर्वी केंद्रातील मोहम्मद अस्लम आणि मनिष पुनित यांनी १७ ऑगस्ट रोजी वरील जवानांकडे एके-४७ पाहिल्याचे चौकशीत पुढे आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर राजेश कुमार व संदीप मिना यांनी केंद्रातील विविध ठिकाणी शोध घेतला आणि चौकशी केली. मात्र, कोठोही त्यांना एके-४७ मिळाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 40 Questions List : जनगणनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अनुसूचित जाती-जमाती अन् विशिष्ट जातींची होणार नोंद; पाहा 40 प्रश्नांत काय?

Raj Thackeray : पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले- ज्यांना सत्ता दिली त्यांनाच जाब विचारा

Sangli Milk Collection Drop : FDA च्या धाडींमुळे सांगलीतील दुधाचा 'बनावट खेळ' बंद? तब्बल 78 हजार लिटरने दुधाची आवक घटली; पाहा आकडेवारी

Marathi News Live Updates : बीडच्या इमामपूरचंही नाव बदलणार? मंत्री भरत गोगावलेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Shivsena Express: कोकण प्रवास मोफत करता येणार, गणेशोत्सवासाठी मुंबईतून विशेष ट्रेन सुटणार; कुठून आणि कधी?

SCROLL FOR NEXT