Belgaum APMC closed in monday 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव एपीएमसी सोमवारी राहणार बंद

सतीश जाधव

बेळगाव: कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (एपीएमसी) बाजार उपकर 0.35 टक्‍यावरून 1 टक्‍यापर्यंत वाढविल्याच्या निर्णयामुळे बेळगाव एपीएमसीतील सर्व व्यवहार सोमवारी (ता.21) बंद ठेवण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी आपला माल आणू नये तसेच मालाची पट्टी घेण्यासाठीही येऊ नये, असे आवाहन व्यापाऱ्यांनी केले आहे. यासंबंधी रताळी, बटाटा, गुळ मार्केट असोशिएशनकडून एपीएमसी सचीवांना निवेदन देण्यात येणार आहे. कांदा मार्केटचे व्यापारी देखील बंदमध्ये सहभागी असणार आहेत.

यासंबंधी रविवारी (ता.22) बटाटा, रताळी, गुळ मार्केट असोसिएशनची बैठक झाली. या बैठकीत उपरोक्त निर्णय घेण्यात आला. एपीएमसी व्यापाऱ्यांकडून शेकडा कर आकारणी करते. यापूर्वी हा कर 1 रुपये होता. याला व्यापाऱ्यांनी विरोध केल्यानंतर हा कर 0.35 टकके करण्यात आला होता. मात्र, पुन्हा हा कर 1 रुपये करण्यात आला आहे. यामुळे व्यापाऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. यासंबंधी कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स ऍन्ड इंडस्ट्रीजने (केसीसीआय) एपीएमसी बंद पुकारला आहे. त्याला बेळगाव एपीएमसीतील असोसिएशन व व्यापाऱ्यांनी देखील पाठिंबा दर्शविला आहे.

बेळगावातील एपीएमसीत रोज कोट्यावधींची उलाढाल होते. सध्या रताळी व बटाटा मार्केट तेजीत सुरु आहे. मात्र, उपकर वाढविल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे पूर्वीप्रमाणेच 0.35 टक्के उपकराची आकारणी केली जावी, अशी मागणीही केली जाणार आहे. प्रत्येक सोमवारी एपीएमसीतील व्यवहार कमी असतात. मात्र, शेतकरी मालाची पट्टी व पैसे घेण्यासाठी व्यापाऱ्यांकडे येतात. सोमवारी व्यापाऱ्यांनी कुलूपबंद आंदोलन पुकारल्यामुळे शेतकऱ्यांनी एपीएमसीत येऊ नये, असे आवाहन केले आहे. बैठकीला बटाटा, रताळी मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष एन. एस. झंगरुचे, उपाध्यक्ष चेतन खांडेकर, सचीव माणिक होनगेकर, विनायक होनगेकर, नरसिंह पाटील, राजू जाधव, राहूल होनगेकर, विक्रमसिंह कदम-पाटील, सुरेश जाधव, मोहन कुट्रे आदी उपस्थि होते.


संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charges : 15 सप्टेंबरच्या निर्णयानंतर UPI पेमेंटवर MDR शुल्क; PhonePe-Google Payच्या कमाईत मोठी वाढ होण्याची शक्यता

Diwali Railway Tickets : दिवाळीच्या रेल्वे तिकिटांना आतापासूनच प्रतीक्षा ; आरक्षण सुरू होताच पाच मिनिटांत ‘रिग्रेट’; लांब पल्ल्याच्या गाड्यांना मागणी

Pune Bridge Repairs : पुण्यातील २१ पुलांची दुरुस्ती आयुर्मान वाढण्यास मदत; दरवर्षी होणार नियमित तपासणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्र्यांचा आजपासून दुष्काळ पाहणी दौरा

Viral Video : विनायक चतुर्थीनिमित्त अन्नदान कार्यक्रमात दुर्दैवी अपघात; गरम सांबारच्या भांड्यात पडून महिलेचा मृत्यू,थरकाप उडवणारा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT