Belgaum audio fake suspect filed a crime
Belgaum audio fake suspect filed a crime 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावातील 'तो' ऑडिओ बनावट ; संशयितावर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - गेल्या काही दिवसांपासून बनावट ऑडिओ सर्वत्र फिरत होता. त्याची माहिती घेण्यात आली आहे. पोलिस आयुक्तांना त्याची माहिती देण्यात आली असून संशयित व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदविला जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी दिली. 

याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी बोम्मनहळ्ळी यांचा बनावट ऑडिओ तयार झाला होता. त्याद्वारे विविध सूचना कोरोना विषयाला अनुसरून दिल्या होत्या. व्हिडिओ सोशल मिडिया आणि विविध भागामध्ये व्हायरल झाला होता. त्याची माहिती घेण्यात येत होती. जिल्हाधिकारी यांच्याकडे चौकशी केली. त्यांनी ऑडिओ फेक असल्याचे स्पष्ट केले. चौकशी केली जाईल, अशी माहिती दिली होती. त्यानुसार पोलिस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार यांच्याशी बातचीत झाली होती. चौकशीत ऑडिओ कोणाचा याची माहिती मिळाली. पण, अशा स्वरुपाचा ऑडिओ निर्मितीमागे कोणते कारण होते, याची माहिती नाही. 

जिल्हाधिकारी बोम्मनहळ्ळी यांनी दिलेल्या माहितीनसार, गेल्या काही दिवसांपासून त्या ऑडिओची चौकशी केली जात होती. ऑडिओ कोणाचा व त्यामागील व्यक्ती कोण, त्याची माहिती घेण्यात आली आहे. लोकांची दिशाभूल आणि खोटी माहिती संवेदनशिल परिस्थित केली आहे. त्यामुळे गुन्हा नोंदविण्याचा आदेश बजाविला आहे. पोलिस आयुक्तांशी चर्चा केलेली आहे. त्यानुसार गुन्हा नोंदविला जाईल. शिवाय चौकशीनंतर फेक ऑडिओ निर्मितीमागील कारण स्पष्ट होईल, अशी माहिती बोम्मनहळ्ळी यांनी दिली आहे. 


ऑडिओत काय? 
कोरोना पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन जाहीर केले आहे. पण, या दरम्यान महाभागाने जिल्हाधिकारी यांच्या नावे बनावट ऑडिओ बनविले. त्यामध्ये लॉडडाऊनमध्ये कोणीही बाहेर पडू नये, असे स्पष्ट केले. जीवनाश्‍यक वस्तू वगळता सर्व सेवा बंद ठेवण्यात आली आहे. कोणीही बाहेर पडू नये. पण, दूध, भाजीपाला पुरवठ्याला व्यत्यय निर्माण होणार नाही, त्याची काळजी घेण्यात यावी, या आशयाचा ऑडिओ व्हायरल झाला होता. त्याची चौकशी करण्यात आली आणि संशयिुतांवर गुन्हा नोंदविला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP Boat Capsized: वादळाने केला घात! बोट उलटून एकाच कुटुंबातील 7 जणांना जलसमाधी, 5 लहान मुलांचा समावेश

Sunita Williams’ Space Mission: पुन्हा एकदा सुनीता विल्यम्सची अवकाश यात्रा टळली, शेवटच्या क्षणाला अंतराळ मोहीम रद्द

T20 World Cup 2024 : टीम इंडियाच्या कॉम्बिनेशन बदललं... जैस्वालची सुट्टी तर 'हा' खेळाडू करणार रोहितसोबत ओपन?

Latest Marathi News Update : अजित पवारांची राष्ट्रवादी अरुणाचलमध्ये 'इतक्या' जागांवर आघाडीवर

Adani Project : 'तारळी धरणावरील अदानी प्रोजेक्टला 102 गावांचा कडाडून विरोध, शेतकऱ्यांना धमकावून लाटल्या जमिनी'

SCROLL FOR NEXT