हुतात्म्यांना अभिवादन sakal
पश्चिम महाराष्ट्र

Belgaum : सीमाप्रश्‍न सुटेपर्यंत संघटित राहू

हुतात्म्यांना अभिवादन; शहरातून मराठी भाषकांची भव्य फेरी

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : सीमाप्रश्नाची सोडवणूक होईल, तोपर्यंत संघटित राहण्याचा निर्धार हुतात्मा दिनी मराठी भाषिकांनी केला असून, हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमाला मराठी भाषिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तसेच, खासदार धैर्यशील माने यांच्यासह महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात बंदी केली जात असल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला.

१९५६ मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना शहर महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे हुतात्मा चौक येथे अभिवादन करण्यात आले. प्रारंभी मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या हस्ते हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. बी. ओ. येतोजी यांनी दीपप्रज्वलन केले.

प्रास्ताविक करताना ‘मध्यवर्ती’चे सरचिटणीस आणि माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी भाषावार प्रांतरचना करण्यात आल्यावर सीमाभागात तीव्र आंदोलन करण्यात आले. या वेळी १९५६ मध्ये झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात मारुती बेन्नाळकर, लक्ष्मण गावडे, महादेव बारागडी, मधू बांदेकर व कमलाबाई मोहिते यांनी हौतात्म्य पत्करले; तर त्यानंतर तीन जणांचा तुरुंगात मृत्यू झाला. या सर्व हुतात्म्यांचे बलिदान कायम लक्षात ठेवून सीमाप्रश्नाची सोडवणूक होईल, तोपर्यंत सर्वांनी संघटित राहू या.

आतापर्यंत अनेक प्रकारचे लढे दिले आहेत. मुंबई प्रांतातील मराठी बहुभाषिक भाग तत्कालीन म्हैसूर राज्यात डांबला. मात्र, मराठी भाषिकांनी आपला स्वाभिमान कायम ठेवत महाराष्ट्रात जाण्याची लढाई सुरू ठेवली आहे. कर्नाटक सरकार संविधानविरोधी काम करीत असून, घटनेची पायमल्ली केली जात आहे. याचा समितीतर्फे तीव्र शब्दांत निषेध करीत आहोत, असे मत व्यक्त केले.

‘मध्यवर्ती’चे अध्यक्ष दळवी यांनी ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनानंतर मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र, आपल्या मनातील ऊर्मी कायम ठेवत आपण प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सदैव कटिबद्ध राहूया, असे मत व्यक्त केले. हुतात्म्यांना अभिवादन केल्यावर रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, खडे बाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, अनसुरकर गल्ली, किर्लोस्कर गल्ली या भागातून रॅली काढण्यात आली.

खजिनदार प्रकाश मरगाळे, रमाकांत कोंडुसकर, रणजित चव्हाण-पाटील, नेताजी जाधव, ॲड. अमर यळ्ळूरकर, माजी महापौर किरण सायनाक, चंद्रकांत गुंडकल, महेश जुवेकर, मारुती मरगानाचे, प्रकाश शिरोळकर, सचिन गोरले, रामा शिदोळकर, रेणू किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील, सुधा भातकांडे, नगरसेविका वैशाली भातकांडे, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, विनोद आंबेवाडीकर, श्रीधर खण्णूकर, बाबू कोले, दिनेश रावळ,

मनोहर हलगेकर, पंढरी परब, नारायण किटवाडकर, अजित कोकणे, बापू जाधव, शिवानी पाटील, नगरसेवक रवी साळुंखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल देसाई, रणजित चव्हाण-पाटील, नेताजी जाधव, बंडू केरवाडकर, प्रकाश राऊत, संजय शिंदे, धनराज गवळी आदींनी हुतात्म्यांना अभिवादन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Politics: पत्नीसाठी पदाचा गैरवापर; १५ दिवसातच रोजगार मंत्र्याला पदावरून हटवलं, नेपाळ सरकारमध्ये मोठी हालचाल

IPL 2026 : लखनौ सुपर जायंट्सला २ कोटीच्या खेळाडूने दिला दगा... रिषभ पंतच्या संघात बोलावला आफ्रिकन ऑल राऊंडर

Harshvardhan Sapkal Baramati : 'उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर...', हर्षवर्धन सपकाळांचा पवारांच्या बालेकिल्ल्यात इशारा

RR vs RCB Weather Update: विराट कोहली- वैभव सूर्यवंशी, संघर्षावर पावसाचं सावट; RR ने MIला जसे धुतले, तसेच RCBला चोपावे लागणार

Shirol Accident news : आठ दिवसात ३ वेळा नशीबाची साथ, पण नियतीच्या मनात वेगळचं होतं, शिरोळचा आकाश अपघातातच गेला

SCROLL FOR NEXT