BCB Recruitment Scam Sakal
पश्चिम महाराष्ट्र

BCB Recruitment Scam : कॅन्टोन्मेंट बोर्ड भरतीसाठी शेकडो अर्ज पण निवड मात्र २९ उमेदवारांचीच; CBIच्या पुढील भूमिकेकडे लक्ष

Belgaum Cantonment Board Recruitment Scam : उर्वरित उमेदवारांवर अन्याय; चांगले गुण मिळालेले अनेकजण निवडी बाहेर

सकाळ वृत्तसेवा

Belgaum News : कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये २९ जागांच्या भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे. यासाठी शेकडो उमेदवारांनी अर्ज केले होते. २९ उमेदवारांची निवड करण्याचे अगोदरच नियोजन झाले होते. त्यामुळे उर्वरित उमेदवारांवर अन्याय झाला आहे. याची चर्चाही सध्या कॅन्टोन्मेंट हद्दीत मोठ्या प्रमाणात रंगत आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डात गतवर्षी जानेवारीत भरती प्रक्रिया झाली. यासाठी बोर्डाकडून जाहीर निवेदन दिले होते. त्यानंतर अनेकांनी अर्ज दाखल केले होते. नियोजनानुसार कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये लेखी परीक्षा व मुलाखती व इतर प्रक्रिया झाली. लेखी परीक्षेत अनेक उमेदवारांना चांगले गुण मिळाले होते. मात्र, त्यांना मुलाखत व इतर माध्यमातून चांगले गुण नसल्याचे कारण देत बाहेर केले. पैसे घेतलेल्या उमेदवारांची निवड झाल्यामुळे इतर उमेदवारांवर अन्याय झाल्याची चर्चा होत आहे.

सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर दहा दिवसांचा कालावधी उलटला आहे. प्राथमिक पातळीवर फक्त गुन्हा दाखल केला आहे. पुढील कार्यवाही अद्यापही झालेली नाही. दहा दिवसांपासून कॅन्टोन्मेंट बोर्डाचे गुन्हा दाखल केलेले कर्मचारी कामावर उपस्थित आहेत.

मात्र, बोर्डात शांतता निर्माण झाली आहे. सीबीआयच्या पुढील कार्यवाहीकडेच सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे. बेळगाव कॅन्टोन्मेंट हद्दीसह शहरात या घोटाळ्याची चर्चा रंगत आहे. मात्र, सीबीआयच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.

या भरतीत बेळगाव परिसरातीलच उमेदवारांची निवड केली आहे. कर्नाटक राज्यासह इतर राज्यातील काही उमेदवार या भरती प्रक्रियेत सहभागी झाले होते. अनेकांनी उत्तम गुण मिळविले आहेत. मात्र, त्यांची निवड केली नाही.

त्यामुळे त्यांच्यातून नाराजी व्यक्त केली जात होती. भरती प्रक्रियेत कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. आनंद यांचा महत्त्वाचा सहभाग होता, असे एफआयआरमध्ये सीबीआयने नमूद केले आहे. सध्या त्यांनी आत्महत्या केल्यामुळे सीबीआयसमोर पेच निर्माण झाला आहे.

काहीजणांची चौकशी बाकी

मिळालेल्या माहितीनुसार सीबीआयने २९ जणांपैकी फक्त काहीच जणांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. गुन्हे दाखल केले नसलेल्यांपैकी अद्यापही काही जणांची चौकशी करणे बाकी आहे. त्यामुळे ते भीतीच्या छायेखाली आहेत. सीबीआयच्या पुढील भूमिकेकडे त्यांचे लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price Hike : सामान्यांच्या खिशाला कात्री! साखर थेट शंभरीपार जाण्याची शक्यता; दिवाळीचा फराळही होणार महाग? दुष्काळ, एल निनो, इथेनॉलमुळं वाढलं टेन्शन

Asian Games 2026: चक दे इंडिया! भारताचा पाकिस्तानवर रोमहर्षक विजय; हॉकीचं सुवर्णपदक आता एक विजय दूर...

Ration Card: 'त्या' शिधापत्रिका निष्क्रिय होणार, सहा महिने धान्याची उचल नसल्यास सरकार घेणार मोठा निर्णय

IT Industry: पुण्यातील आयटी क्षेत्रासाठी महत्त्वाची घोषणा! नवीन रोजगार निर्मितीला फायदा

Latest Marathi News Live Update : कन्नड तालुक्यावर भीषण दुष्काळाचे सावट; हातातोंडाशी आलेली खरीपाची पिके डोळ्यांसमोर जळून खाक

SCROLL FOR NEXT