belgaum collector harishkumar said maharashtra transportation use for election
belgaum collector harishkumar said maharashtra transportation use for election 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या बस घेणार; जिल्हाधिकारी हरीशकुमार

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : लोकसभा पोटनिवडणुकीपूर्वी कर्मचाऱ्यांचे आंदोलन न थांबल्यास निवडणुकीसाठी महाराष्ट्र एस. टी. महामंडळाची मदत घेतली जाणार आहे. महाराष्ट्राने निवडणूक कामासाठी ५०० बस पुरविण्याची तयारी दर्शविली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. के. हरीशकुमार यांनी दिली आहे.

परिवहन कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा परिणाम निवडणूक सेवेवर होणार आहे. आंदोलन मागे न घेतल्यास मतदानासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचारी, ईव्हीएम यंत्रे नेण्यात अडथळे येणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर बेळगावचे जिल्हाधिकारी डॉ. हरीशकुमार यांनी महाराष्ट्राशी संपर्क साधला असून कर्नाटक परिवहन कर्मचाऱ्यांचा संप सुरू राहिल्यास महाराष्ट्राची लालपरी बेळगावच्या पोटनिवडणुकीत सेवा बजावणार आहे. आज (१०) जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले, निवडणूक कार्यात मतदान यंत्रे आणि कर्मचारी मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी बस आणि वाहनांची व्यवस्था आवश्‍यक असते. त्यासाठी वायव्य परिवहन महामंडळाकडे बसची व्यवस्था करण्यासंबंधी सांगितले आहे. तरीही गरज भासल्यास पर्यायी व्यवस्था केली जाणार आहे.

पोटनिवडणुकीसाठी ४०० बसेसची आवश्‍यकता आहे. त्यासाठी वायव्य परिवहन महामंडळाकडे मागणी करण्यात आली आहे. त्यासह खासगी बस चालकांशीही याबाबत चर्चा करण्यात आली आहे. इतके असूनही निवडणुकीसाठी प्लान बी तयार असून महाराष्ट्र एस. टी. महामंडळाशी चर्चा करण्यात आली आहे. गरज भासल्यास महाराष्ट्र एसटी महामंडळ ५०० बसेस निवडणूक कार्यासाठी देण्यास तयार आहे. एका बसमधून पाच मतदान केंद्रावर मतयंत्रे पाठविली जाऊ शकतात. शासकीय पातळीवर यासंबधी चर्चा सुरू असून सर्व बाबींवर चर्चा केली जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. हरिषकुमार यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT