भाजपचा गड काँग्रेस भेदणार sakal media
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : भाजपचा गड काँग्रेस भेदणार?

कंत्राटदार आत्महत्येने वातावरण तापले; जिल्ह्यासह राज्यात पडसाद

राजेश नागरे

बेळगाव: एखाद्या प्रकरणावरुन बेळगावात ठिणगी पडल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटतात, याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. ४० टक्के कमिशनच्या विषयावरुन राजकीय वातावरण तापले असून यात कंत्राटदार संतोष पाटील यांचा बळी गेला. त्याचे जोरदार पडसाद जिल्ह्यासह राज्यात उमटण्यास सुरुवात झाली आहे.

बेळगावसह उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यात ज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतात, त्या पक्षाची राज्यात सत्ता येते, असे मानण्यात येते. यामुळे भाजप आणि काँग्रेसने आतापासूनच जोर लावण्यास सुरुवात केली आहे. तसेच उत्तर कर्नाटकातील प्रत्येक घडामोडींवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, बेळगावमधील ठेकेदाराने उडपीत आत्महत्या केल्यानंतर ४० टक्के कमिशनच्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. यातून ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री के. एस. ईश्‍वरप्पा तसेच राज्य सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.

तर या विषयावर काँग्रेस अधिक आक्रमक झाला आहे. भाजपच्या राज्य कार्यकारिणीची सभा मंगळवारी (ता. १२) बेळगावात झाली. आगामी विधान परिषद तसेच विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने कार्यकारिणीची बैठक घेतली. मात्र, नेमक्या त्याचदिवशी कंत्राटदार पाटील यांच्या आत्महत्येचे प्रकरण उघडकीस आले. त्यामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

मंगळवारीच आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. तर दुसऱ्या दिवशी (ता. १३) निदर्शने, पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात राष्ट्रीय व राज्य पातळीचे नेते उपस्थित राहिल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून बेळगाव जिल्हा राजकीय घडामोडींचे केंद्र ठरला आहे. एकंदरीत राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या आणि भाजपने हळूहळू वर्चस्व मिळविलेल्या बेळगाव जिल्ह्यावर काँग्रेस पुन्हा पकड मिळविण्याची तयारी करत आहे.

‘आप’ वाढवतोय ताकद

राज्यात सत्ता स्थापण्यासाठी बेळगाव जिल्ह्यासह उत्तर कर्नाटक महत्वाचे आहे. यामुळे धजद पक्षाने यापूर्वी तितकेच प्रयत्न केले. मात्र, त्यांना अपेक्षित यश मिळालेले नाही. परंतु, आता आम आदमी पक्षाने ताकद वाढविण्यावर भर दिला आहे. त्यादृष्टीने आपकडून नियमित आंदोलने, दिग्गज नेत्यांच्या सभा आयोजित केल्या जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील नांदणी तपासणी नाक्यावर लाच घेणारा आरटीओ निरीक्षक व खासगी व्यक्ती रंगेहाथ सापडला, ड्रॉव्हरमध्ये किती रुपये, वाचा...

Islapur News : बँकेच्या कर्जाला कंटाळुन एका शेतकऱ्याने गळफास घेऊन संपविले जीवन

Vehicle Fitness Test: आरटीओची मोठी डिजिटल झेप! ६ मिनिटांत वाहनांची फिटनेस तपासणी करणार, नवीन प्रणाली कधी लागू करणार?

Pune BJP leads in campaign : पुण्यात भाजपचा प्रचाराचा धडाका!, महापालिका निवडणुकीसाठी जबरदस्त नियोजन

Ajit Pawar: धनंजय मुंडेंना पुन्हा संधी! राष्ट्रवादीची यादी जाहीर; नेत्यांची संपूर्ण लिस्ट पाहा

SCROLL FOR NEXT