दोन हजार कामगारांचा मोर्चा sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयावर कामगारांचा मोर्चा

दोन हजार कामगारांचा मोर्चा; विविध मागण्यांसाठी आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव: कामगारविरोधी धोरणासह खासगीकरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या दोन दिवसीय संपाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. २९) शहरात मोर्चा काढून जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. तसेच मागण्या मान्य करण्याची विनंती करण्यात आली. बेळगाव शहर व परिसरातील सुमारे २ हजार कामगारांनी या मोर्चात सहभाग दर्शविला होता.

विविध मागण्यांसाठी कामगारांनी सोमवारी (ता. २८) व मंगळवारी (ता. २९) असा दोन दिवस देशभर संप पुकारला. यामध्ये पोस्ट, अंणवाडी, बीएसएनएल, बँक, मेडिकल रिप्रझेंटेटीव्ह, एपीएमसी व्यापारी,सीआयटीयु, केएसआरटीसी कर्मचारी, आशा कार्यकर्ता आदींनी बंद ठेवून सहभाग घेतला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी, तुमचे निवेदन सरकारला पाठविले जाईल. तुमच्या मागण्या योग्य आहेत, असे वाटते. याचा सरकार नक्की विचार करेल, असा विश्‍वास दिला.या आंदोलनाच्या माध्यमातून विविध मागण्या करण्यात आल्या. केंद्र सरकारने सर्वच क्षेत्राचे खासगीकरण सुरु केले आहे. यामुळे भविष्यात नागरीकांना अडचणी येणार आहेत. तसेच केंद्र व राज्य सरकार नेहमी शेतकरी विरोधी भूमिका घेत आहे. यामुळे सरकारने खासगीकरण रद्द करावे तसेच महागाईवर अंकुश ठेवावा आदी घोषणा यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनात महागाई हा मुद्दा महत्वाच्या स्थानी होता. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात महागाई वाढत आहे. त्यामुळे महागाईवर अंकुश ठेवावा. यावेळी ॲड. नागेश सातेरी, सी. व्ही. खराडी, जी. एन. जैनेखान, एल. एस. नायक, जी. व्ही. कुलकर्णी, यल्लुबाई शिगिहळ्ळी, सी. एस. बिदनाळ आदी उपस्थित होते.

विविध मागण्यांचे निवेदन

खासगी कंपन्यातील खासगीकरण रोखा, कंत्राटदारी पद्धत बंद करा. नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागु करा, बीएसएनएल वाचवा, यासाठी ४ जी सुविधा सुरु करा, पोस्टाचे खासगीकरण करू नका, औषधांच्या भयानक किमती वाढल्या आहेत. त्या कमी करा आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन; दिला सतर्कतेचा इशारा

Nagpur Vidhan Bhavan Project: नागपूर विधानभवनाचे रूपडे पालटणार; १,००० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, दोन्ही सभागृह येणार एकाच छताखाली

Latest Marathi Live Update : लोणावळ्या कडे जाणाऱ्या रोडवर दरड कोसळली, कातळ धबधबा शेजारची घटना

Maharashtra Rain: पालघरमध्ये मुसळधार! 24 तासांत 134 मिमी पाऊस, जनजीवन विस्कळीत; वाहतूक ठप्प

Navi Mumbai: बटाटावड्यात आढळली अळी, नवी मुंबई महापालिकेच्या भोजनालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT