Belgaum Municipal sakal media
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : जाहिरात कर वसुलीसाठी ई लिलाव प्रक्रिया

कॅंटीलिव्हर, गॅंट्रीजवर कर वसुलीसाठी १९ रोजी प्रक्रिया

राजेश नागरे

बेळगाव : बेळगाव शहरातील कॅंटीलिव्हर व गॅंट्रीजवरील जाहिरात कर वसुलीच्या ठेक्यासाठी महापालिकेने ई लिलाव प्रक्रिया आयोजित केली आहे. १९ एप्रिल रोजी ही लिलाव प्रक्रिया होणार आहे. बेळगाव शहरात महापालिका हद्दीत चार ठिकाणी गॅंट्रीज आहेत. त्यावर एका बाजूला दिशा व मार्ग दर्शविणारी माहिती आहे.

दुसऱ्या बाजूला जाहिरात प्रसिद्ध करण्याची मुभा आहे. त्या जाहिरातीच्या कर वसुलीचा ठेका महापालिकेकडून दिला जातो. आधी ज्या ठेकेदाराकडे गॅंट्रीजच्या जाहिरात कर वसुलीचा ठेका होता, त्या ठेकेदाराची मुदत आधीच संपली आहे. त्यामुळे नव्या ठेकेदाराची नियुक्ती केली जाणार आहे. या लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांना ३ हजार ८०० रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. गॅंट्रीजवरील जाहिरात कर वसुलीच्या ठेक्याच्या लिलावासाठी १ लाख ४९ हजार ३०० रुपये इतकी मूळ बोली निश्‍चित करण्यात आली आहे. ई-लिलावात भाग घेणाऱ्यांना त्यापुढे बोली लावावी लागणार आहे. शहरात तब्बल २० ठिकाणी कॅंटीलिव्हर आहेत. त्यावरील जाहिरात कर वसुलीचा ठेका दिला जाणार आहे.

या कॅंटीलिव्हरच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना ९ हजार ४०० रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. शिवाय ३ लाख ७३ हजार २४० रुपये इतकी मूळ बोली निश्‍चित करण्यात आली आहे. इच्छुकांना त्यापुढे बोली लावावी लागणार आहे. दोन्ही लिलाव प्रक्रियेत सर्वोच्च बोली लावणाऱ्याला जाहिरात कर वसुलीचा ठेका दिला जाणार आहे. या लिलाव प्रक्रियेत सहभाग नोंदविण्यासाठी इच्छुकांना १४ एप्रिल ही अंतिम तारीख आहे.

गॅंट्रीज व कॅंटीलिव्हरवरील जाहिरात कर वसुलीच्या ठेक्याची मुदत संपली आहे. मुदत संपूनही जुन्या ठेकेदारांकडूनच जाहिरात कर वसुली केली जात असल्याची तक्रार आमदार अभय पाटील यानी केली होती.

सहा वेळा लिलाव प्रक्रियेस प्रतिसाद नाही

बेळगाव शहरातील खासगी व महापालिकेच्या मालकीच्या जागेतील सुमारे १८० होर्डिंग्ज, दुभाजकावरील मेडीयन्स, गॅंट्रीज व कॅंटीलिव्हर या माध्यमातून महापालिकेला जाहिरात कर मिळतो. पण जाहिरात कर महापालिकेकडून थेट वसूल केला जात नाही. यासाठीचा ठेका दिला जातो. ज्या कंपनीला जाहिरात कर वसुलीचा ठेका मिळेल त्या कंपनीकडून रीतसर परवानगी घेऊन व निर्धारित शुल्क भरून वरील ठिकाणी जाहिरात करता येते. बेळगावात वरील सर्व प्रकारच्या जाहिरात कर वसुलीच्या ठेक्यासाठी स्पर्धा असते. पण १८० होर्डिंग्जच्या जाहिरात कर वसुलीच्या ठेक्यासाठी सहा वेळा लिलाव प्रक्रिया आयोजित करूनही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे होर्डिंग्जवरील जाहिरात कर वसुलीच्या ठेक्यासाठीच्या लिलाव प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुपाली चाकणकरांची चौकशी होणार? राजीनाम्यानंतर पक्षाकडूनही कारवाईचे संकेत, अडचणी वाढण्याची शक्यता

Satara ZP Violence : सातारा जिल्हा परिषदेत राडा! पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या हाताला जखम; भाजप कार्यकर्त्यांवर धक्काबुक्कीचा गंभीर आरोप

बिग बॉस मराठीमधून जुने सदस्य नाही तर या वाईल्ड कार्ड एन्ट्रीची एक्झिट ! सदस्यांनाही बसला धक्का

गलतीसे मिस्टेक! एअर इंडियानं कॅनडात प्रवेशाला बंदी असलेलं विमान पाठवलं, ४ तासांनी समजली चूक; तोपर्यंत विमान....

Satara Police Action : पालकमंत्र्यांचाही आदेश झुगारला! साताऱ्यात पोलिसांनी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन करून कोणाला उचललं? हॉटेल रेडबटनवर रात्री 2 वाजता काय घडलं?

SCROLL FOR NEXT