belgaum sakal
पश्चिम महाराष्ट्र

Belgaum : सक्तीने करण्यात आलेल्या बदल्या अखेर रद्द

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर परिवहन कर्मचारी संघटनेने आंदोलन घेतले मागे

विनायक जाधव

बेळगाव : परिवहन आंदोलन काळात सक्तीने बदली करण्यात आलेल्या परिवहन कर्मचाऱ्यांची बदली अखेर रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आपल्या मूळ जागी पुन्हा सेवा करण्याची संधी मिळाली आहे.

सहावे वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी परिवहन कर्मचाऱ्यांनाही करावी. या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी ६ ते २१ एप्रिलपर्यंत आंदोलन छेडले होते. हे आंदोलन दडपण्यासाठी शासनाने परिवहन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यासह सक्तीची बदली प्रक्रिया राबविली होती. बेळगाव विभागातील ९७ कर्मचाऱ्यांना हावेरी, गदग अशा दूर ठिकाणी नियुक्त करण्यात आले होते. तर त्या विभागातील कर्मचाऱ्यांची बेळगाव विभागात बदली करण्यात आली होती.

यासह बेळगाव विभागातील आठ कर्मचाऱ्यांना बडतर्फ तर ५६ हुन अधिक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. या कारवाई विरोधात कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली असून हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे. बेळगाव विभागातून ज्या कर्मचाऱ्यांची अन्यत्र बदली करण्यात आली, ते सर्व कर्मचारी आंदोलनात अग्रेसर होते. यातील अनेक कर्मचारी हे संघटनेचे पदाधिकारी होते. त्यामुळे आंदोलन दडपण्यात शासन देखील यशस्वी ठरले होते. अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर परिवहन कर्मचारी संघटनेने आपले आंदोलन मागे घेतले.

दरम्यान आंदोलन मागे घेतले तरी, बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना बेळगावातून हावेरी आणि गदग येथे जाऊन काम करावे लागत होते. आपली बदली रद्द करून घेण्यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केले होते. अखेर या प्रयत्नांना यश आले असून कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गदग आणि हावेरी तसेच परिवहनच्या इतर आगारांमध्ये बदली होऊन जाऊन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा आपल्या मूळ बेळगाव विभागात काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI News: WhatsApp वर RBI चा मेसेज आला? खिशातील रुपया आता मोबाईलमध्ये! डिजिटल रुपया म्हणजे काय आणि तो कसा वापरायचा जाणून घ्या

Team India : सूर्यकुमार यादवसाठी दरवाजे अजूनही खुले... माजी कर्णधाराचे टीम इंडियात पुनरागमन शक्य... जाणून घ्या, कसं!

Latest Marathi News Live Update : कॅलिफोर्नियातील जॉर्डन ब्राउन या अमेरिकन नागरिकाला अटक केली

IND vs ENG: 'Lords' वर देव! भारतीय महिला खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी पोहोचला सचिन तेंडुलकर Video

Devkund News: देवकुंड डोहात बुडालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह 50 फूट खोल डोहात सापडले; अवघ्या पंधरा मिनिटात रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

SCROLL FOR NEXT