पश्चिम महाराष्ट्र

बेळगावात आरोग्य विभाग अर्लट; विद्यार्थ्यांची कोरोना तपासणी सुरू

मल्लिकार्जुन मुगळी

शाळा सुरू करण्याच्या शिक्षण खात्याच्या निर्णयाला शंभर टक्के प्रतिसाद मिळालेला नाही.

बेळगाव : बेळगाव शहर व तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची कोरोना तपासणी मोहीम आरोग्य विभागाकडून हाती घेण्यात आली आहे. ॲंटीजेन ऐवजी आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. सर्व सरकारी व अनुदानीत शाळांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे. राज्यातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग २३ ऑगस्टपासून सुरू झाले. त्यानंतर ६ सप्टेंबरपासून सहा ते आठवीपर्यंतचे वर्गही सुरू झाले.

कोरोना नियमांचे पालन करून शाळांमध्ये वर्ग भरवले जात आहेत. शाळा सुरू करण्याच्या शिक्षण खात्याच्या निर्णयाला शंभर टक्के प्रतिसाद मिळालेला नाही. अद्यापही काही विद्यार्थी घरी बसूनच शिक्षण घेत आहेत. पण जे विद्यार्थी शाळेत जावून अध्ययन करत आहेत, त्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेळगाव शहर व तालुक्यात सोमवारपासून (२०) एकाचेळी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासाठी २२ पथकांची स्थापना करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

बेळगावातील नगर आरोग्य केंद्रे व ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात ज्या सरकारी, खासगी व अनुदानीत शाळा येतात, त्या सर्व ठिकाणी ही तपासणी सुरू झाली आहे. त्या तपासणीचा अहवालही तातडीने तयार केला जाणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले तर लगेचच पुढील कार्यवाही केली जाणार आहे. या मोहीमेसाठी शिक्षण खात्याची मदतही घेतली जात आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर शाळा सुरू करण्याचा धाडसी निर्णय शासनाने घेतला.

पहिल्यांदा केवळ नववी ते बारावीपर्यंतच्याच शाळा सुरू झाल्या. शाळा सुरू व्हाव्यात की नाही याबाबत राज्यातील पालकांकडून संमिश्र प्रतिक्रिया होत्या. पण शाळा सुरू व्हाव्यात अशीच मागणी बहुतेक पालकांची होती. कोरोनामुळे शाळा बंद झाल्या व त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. हे नुकसान थांबवण्यासाठी खबरदारी घेवून शाळा सुरू करण्यात आल्या. शाळेत कोरोना नियमांचे पालन करून बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

थर्मल स्कॅनरच्या माध्यमातून दररोज विद्यार्थ्यांची तपासणी करणे, सॅनिटायजरचा वापर करणे, शाळेच्या परीसराचे निर्जंतुकीकरण करणे अशा उपाययोजनाही सुरू आहेत. पण त्यापुढे जात थेट विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. गतवर्षी शाळा व महाविद्यालये सुरू झाली, त्यावेळी केवळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात काही विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यावेळी शालेय विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली नव्हती. यंदा महाविद्यालयीन परीक्षांच्या आधी विद्यार्थ्यांना कोरोना लस देण्यात आली आहे. पण १८ वर्षाखालील मुलांसाठी अद्याप लस उपलब्ध नाही. त्‍यामुळे सध्या केवळ कोरोना चाचणीच केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

Amravati Food Safety Action: अमरावतीत घाणेरड्या वातावरणात नूडल्स निर्मिती; कुत्रे-मांजरांचा वावर उघड, दोन गृहउद्योगांचे परवाने तातडीने निलंबित

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

SCROLL FOR NEXT