rani channmma university sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव: RCU’ त ८ जणांची नियमबाह्य नेमणूक

लेखापरीक्षणात शेरा; वयोमर्यादा ओलांडलेल्यांना संधी, वेतन परत घेण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव: राणी चन्नम्मा विद्यापीठातील विविध पदांच्या नेमणुका नियमबाह्य झाल्या आहेत. वयोमर्यादेसंदर्भातील जारी अधिसूचनेचे उल्लंघन करुन २०१२ मध्ये ८ जणांची नियुक्ती झाली आहे. डिसेंबर २०२० मधील लेखापरीक्षणमध्ये सदर बाब पुढे आल्यानंतर १,०९,४७,५०१ रक्कमेच्या वसुलीचे आदेश बजाविण्यात आल्याचे माहिती हक्क अंतर्गत मिळाली आहे.

आरसीयूतर्फे उद्यान अधीक्षक (गार्डन सुप्रीडेंट), प्रथम दर्जा (एफडीए), द्वितीय दर्जा सहाय्यक (एसडीए) पदांच्या भरतीसाठी २०१२ मध्ये अधिसूचना काढली. त्यानुसार भरती करणे बंधनकारक असताना त्याला छेद देत वयोमर्यादा ओलांडलेल्या ८ जणांची नियुक्ती करण्यात आली. माहिती अर्जाखाली ॲड. सुरेंद्र उगारे यांनी लेखापरीक्षणाचा तपशिल मिळविला असून त्यात सदर बाब पुढे आली आहे. उद्यान अधीक्षक पद इतर मागासवर्ग २ अ वर्गासाठी राखीव होते. तर वयोमर्यादा ३५ ते ३८ निश्‍चित करण्यात आली होती. मात्र, या पदासाठी नियुक्त उमेदवाराचे वय ४० वर्षे २ महिने ३ दिवस आहे.

प्रथम दर्जा सहाय्यकाची ४ पदे भरली असून वयोमर्यादा ३५ निश्‍चित केली होती. मात्र, नेमणूक केलेल्या एका महिलेचे वय ३५ वर्षे ५ महिने ११ दिवस, दुसऱ्याचे ३६ वर्ष २ महिने ३ दिवस तर तृतीय महिला उमेदवाराचे वय ३९ वर्षे १० दिवस व चौथ्या महिलेचे वय ३८ वर्षे ३ महिने १४ दिवस आहे. द्वितीय दर्जा सहाय्यकाच्या २ पदासाठी ३८ व ४० वय हवे असताना एकाचे वय ४० वर्षे १ महिना २९ दिवस तर दुसऱ्याचे वय ३८ वय ४ महिने ४ दिवस आहे. डीईओसाठी ३५ ते ३८ वयमर्यादा निश्‍चित असताना नेमणूक केलेल्या महिलेचे वय ३९ वर्षे १ महिना १३ दिवस आहे. नेमणुकीबाबत नियम शिथिल करताना सिंडिकेट बैठकीत चर्चा किंवा शासनाशी पत्रव्यवहार करुन मंजुरी घेणे आवश्‍यक आहे. मात्र, तसा पत्रव्यवहार न झाल्यामुळे भारतीय संविधान विधी १६ अन्वये नेमणुका नियमबाह्य ठरविल्या आहेत.

‘आरसीयू’त २०१२ मध्ये ८ पदांची नेमणूक मनमानी स्वरुपात झाली आहे. वयोमर्यादा ओलांडलेल्यांची नियुक्ती झाली असून याबाबत विद्यापीठाला पत्र पाठवून कारवाईची मागणी करणार आहे. लोकायुक्तांकडेही तक्रार करणार आहे.

ॲड. सुरेंद्र उगारे, माहिती हक्क कार्यकर्ते

‘आरसीयू’तर्फे २०१२ मध्ये नेमणुकीत चूक झाली आहे. मात्र, त्याला खूप वर्षे झाली असून त्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय मानवतेच्या दृष्टीने घेतलेला नाही. तसेच या नेमणुका मी रुजू होण्यापूर्वी झाल्या आहेत.

एम. रामचंद्रगौडा, कुलगुरु, आरसीयू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

कोकण आपलोच आसा! सनई चौघडे मालिकेची टीम पोहचली कणकवलीत, फोटो पाहिलेत का?

MPSC Paper Leak: परीक्षा झाली, मुलाखतीही झाल्या; मग MPSC ने संपूर्ण भरतीच का रद्द केली? पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Latest Marathi News Live Update : टीम कुक ‘ॲपल’ची धुरा सोडणार

Kolhapur Gender Determination Case: गर्भलिंग निदानप्रकरणी ‘एस.पी. टोळी’ला मोका; राज्यातील पहिलीच कारवाई; ११ जणांवर बडगा

SCROLL FOR NEXT