बेळगाव : आंतरराज्य बस सुरु; कर्नाटक राज्य परिवहनचा निर्णय sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : आंतरराज्य बस सुरु; कर्नाटक राज्य परिवहनचा निर्णय

प्रवाशांची होणार सोय

विकास पाटील

निपाणी : कर्नाटक शासनाने मंगळवारी (ता. 9) दुपारपासून सीमा तपासणी नाक्यावरील आरटी-पीसीआरमध्ये शिथिलता आणली आहे. त्यामुळे प्रवाशांसह कामगारांना दिलासा मिळाला आहे. सध्या विविध मागण्यासांठी महाराष्ट्र राज्य परिवहनच्या कर्मचाऱयांचा संप सुरु आहे. त्यामुळे तेथील बससेवा बंद आहे. महाराष्ट्र बस कर्मचाऱयांचा संप मिटल्याबरोबर तातडीने आंतरराज्य बससेवा सुरु करणार असल्याची माहिती चिक्कोडी परिवहन विभागाचे विभागीय नियंत्रणाधिकारी व्ही. एम. शशिधर यांनी दिली.

तब्बल दोन वर्षापासून कोरोना, अतिवृष्टी, महापुरामुळे पूर्ण क्षमतेने बससेवा सुरु झालेली नव्हती. काही ठिकाणी बसेस सुरु होत्या, मात्र प्रवाशांनी पाठ फिरविली होती. त्यामुळे चिक्कोडी परिवहन विभागाचे दहा कोटीचे नुकसान झाले. तसेच यात्रा, जत्रा, शैक्षणिक सहलीतून मिळणारेही उत्पन्न बुडाल्याने चांगलाच फटका सहन करावा लागला. कर्मचाऱयांच्या वेतनासाठी शासनाला इतर निधीतून तजवित करावी लागली. एक वर्षभर निम्मा पगार दिला. अशा अनेक अडचणींचा सामना राज्य परिवहन महामंडळाला करावा लागला आहे.

कर्नाटक राज्य परिवहन महामंडळ आरटी-पीसीआर बंद होण्याची प्रतिक्षा करत होते. त्यामध्ये शिथिलता आली मात्र महाराष्ट्रातील बस कर्मचारयांचा संप असल्याने बससेवा सुरु करण्यात पुन्हा अडचणी आल्या. महाराष्ट्रातील कर्मचारयांच्या संपावर तोडगा निघाल्याबरोबर आंतरराज्य बस तातडीने धावणार आहे. त्याचा प्रवाशांचा लाभ होणार असून परिवहनचे उत्पन्न वाढणार आहे. आंतरराज्य बस सर्व स्थानकात थांबा घेऊन धावणार असल्याचेही अधिकारयांनी सांगितले.

"सध्या शासनाने आरटी-पीसीआरमध्ये शिथिलता आणली आहे. मात्र महाराष्ट्रातील कर्मचाऱयांचा संप सुरु असल्याने आंतरराज्य बससेवा सुरु करण्यात अडचणी आहेत. तेथील संप मिटल्याबरोबर तातडीने बससेवा सुरु करणार आहोत."

-व्ही. एम. शशीधर, विभागीय नियंत्रणाधिकारी, चिक्कोडी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT