अल्पसंख्याक आयोग sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : बेळगाव जिल्हा बहुभाषिकच; अल्पसंख्याक आयोगाकडे नोंद

तब्बल ५९ मातृभाषेच्या लोकांचे वास्तव्य

मिलिंद देसाई

बेळगाव, ता. १२ : मातृभाषेबद्दल प्रत्येकाला आदर अन् आपुलकी असतेच. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या मातृभाषेचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतो. कोणावरही भाषा लादता येत नाही, असे म्हटले जाते. याचीच प्रचिती आपल्याला बेळगाव जिल्ह्यात दिसून येते. जिल्ह्यात विविध प्रकारच्या तब्बल ५९ भाषेच्या लोक राहत असून त्यांची नोंद भाषिक अल्पसंख्याक आयोगाकडे आहे.

दर दहा वर्षांनी करण्यात येणाऱ्या जनगणनेवेळी लोकसंख्येबरोबरच प्रत्येकाच्या भाषेचीही नोंद केली जाते. बेळगाव जिल्ह्यात कन्नड, मराठी, उर्दू या तीन मुख्य भाषेसह देशाच्या विविध भागातून आलेल्या लोकांनी जनगणनेवेळी आपल्या मातृभाषेची नोंद केली आहे. त्यामध्ये अनेक मराठी भाषिकांना परिचित नसलेल्या विविध भाषांचाही समावेश आहे. बेळगाव जिल्ह्याच्या विविध भागात असामी, बंगाली, डोगरी, हिंदी, अवधी, बंजारी, भोजपुरी, बुंदेली, गढवाली, हरियाणवी, खोरता, कुमाऊनी, लमानी, मारवाडी, मेवारी, पहरी, राजस्थानी, काश्मिरी, कोंकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, नेपाली, ओरिया, पंजाबी, संस्कृत, संथाळी, सिंधी, तमिळ, तेलुगू, अडी, अरेबिक, भिल्लोडी, विष्णूपुरीया, कुर्गी, इंग्रजी, खानदेशी, खारिया, खशी, किनोरी, लडाखी, मिझो, पर्शियन, शीना, तिबेटीयन, तुळू आदी मातृभाषेचे लोक कमी-जास्त संख्येने राहतात. दरम्यान, या विविध भाषिक लोकांनी इतर भाषाही शिकल्या आहेत. बहुतेक जण या मातीशी एकरूप झाले असून त्यांनी आपली मातृभाषाही टिकवून ठेवली आहे.

सीमाभागातील मराठी भाषिकांचे अस्तित्‍व संपविण्यासाठी कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर सातत्याने दडपशाही केली जात आहे. त्यांच्यावर या ना त्या प्रकारे कन्नडसक्ती केली जात आहेत. तरीही येथील मराठी भाषिकांनी आपली मातृभाषा टिकवून ठेवली आहे. सरकारने कितीही प्रयत्न केले तरी कोणाचीही मातृभाषा बदलता येत नाही, हे बेळगाव जिल्ह्यात राहणाऱ्या ५९ विविध भाषेच्या लोकांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांवर विनाकारण कन्नडची सक्ती न करता जिल्‍ह्यात १५ टक्क्यांपेक्षा मराठी भाषिक असल्याने त्यांना त्यांच्या भाषेतून सर्व कागदपत्रे व इतर माहिती द्यावी, असे मत व्यक्त होत आहे.

प्रत्येक जण आपल्या मातृभाषेवर प्रेम करतो. त्यामुळेच जनगणनेवेळी एखादी व्यक्ती कोणत्याही भागात राहत असली तरी आपल्या मातृभाषेची नोंद करतो. बेळगाव जिल्ह्यात विविध उद्योगधंदे आणि व्यवसायानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येऊन राहिले आहेत. त्यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणात विविध भाषेचे लोक या ठिकाणी राहत असल्याचे दिसून आले आहे. मराठी भाषिकांनी नेहमीच आपली मातृभाषा टिकावी, यासाठी संघर्ष कायम ठेवला आहे.

- मालोजी अष्टेकर, माजी महापौर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Supply: कल्याण, टिटवाळा शहरांचा पाणीपुरवठा १२ तास बंद! कधी आणि का? जाणून घ्या

IPL 2026: सॅमसन CSK पूर्वी दिल्ली कॅपिटल्समध्ये जाणार होता, डिलही पक्की झालेली; पण राजस्थानच्या 'या' मागणीमुळे सगळंच फिस्कटलं

श्रीनाथ केसरी स्पर्धेवेळी बैलगाड्या उधळल्या, गर्दीत घुसल्या; वृद्धाचा मृत्यू, १३ जखमी

Latest Marathi Breaking News : पुणे पोलिसांचे निलेश घायवळ प्रकरणी ईडीला पत्र

Anjali Damania: ''यांचा गेम करायचाय..'' मनोज जरांगेंपाठोपाठ अंजली दमानिया यांच्या जीवालाही धोका; गाडी बदलत राहण्याचा सल्ला

SCROLL FOR NEXT