Legislative Council sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : अंतिम टप्प्यात प्रचारात जोरदार चुरस

विधान परिषद; राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांतच लढत

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : विधान परिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोचला आहे. पक्षीय पातळीवर व उमेदवारांकडून जोर वाढविण्यात येऊ लागला आहे. निवडणुकीच्या प्रचारामध्ये कोण आघाडीवर आहे आणि विजयाचे दावेदार कोण ठरू शकतात, याबाबत अंदाज बांधले जात आहेत.

राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षाचे उमेदवार विधान परिषद निवडणूक आखाड्यात आहेत. मात्र, ही लढत दुहेरी वाटत आहे. भाजप व कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांत थेट लढत दिसून येत आहे. यामुळे चित्र रंगतदार झाले आहे. यामुळे दोन्ही पक्षांतर्फे जोर लावला जात आहे. उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरु केले आहे. त्याला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन पक्षीय पातळीवर व उमेदवारांकडून विजयाचे संभाव्य दावेदार कोण आहेत, याबाबत अंदाज बांधले जात आहेत.

कर्नाटक वायव्य पदवीधर मतदारसंघातील उमेदवारांची संख्या १३ आहे. मात्र, या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने चुरस भाजप उमेदवार हणमंत निराणी आणि कॉंग्रेस उमेदवार ॲड. सुनील संक यांच्यात आहे. प्रादेशिक पक्षांचे उमेदवार व अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. पण, निराणी आणि संक यांच्यातील चुरस रंगत वाढविणारी ठरत आहे.

पदवीधरप्रमाणे शिक्षक मतदारसंघातही दुहेरी लढत आहे. येथेही राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारात लढत आहे. भाजप उमेदवार अरुण शहापूर निवडणूक आखाड्यामध्ये असून, ते तिसऱ्यांदा निवडणूक लढवीत आहेत. भाजपकडून शहापूर हे निवडणुकीत ‘हॅट्‌ट्रिक’ साधतील, असा दावा केला जात आहे. वैयक्तिक पातळीवरही शहापूर यांनी संपर्क वाढविला आहे. दुसरीकडे मतदारसंघामध्ये माजी खासदार प्रकाश हुक्केरी हे कॉंग्रेसचे उमेदवार असून, ते पहिल्यांदाच शिक्षक संघाची निवडणूक लढवीत आहेत. पण, त्यांचा राजकीय अनुभव आणि कॉंग्रेससह भाजप नेत्यांशी असलेला संपर्क लक्षामध्ये घेतल्यास त्यांनी चांगली मोट बांधली आहे. यामुळे शहापूर यांच्यापुढे कडवे आव्हान उभे केल्याचे दिसत आहे. प्रादेशिक पक्ष व अपक्ष उमेदवारही निवडणूक लढवीत आहेत. पण, त्यांच्यापेक्षा राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांच्या कामगिरीकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT