मराठी एकीकरण समिती sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : मराठी भाषिकांबाबत 60 हजारांहून अधिक पत्रांना उत्तर नाही

पंतप्रधान कार्यालयाकडून देखील मराठी भाषिकांबाबत दुजाभाव केला जात असल्याचे स्पष्ट होते.

मिलिंद देसाई

बेळगाव : खासदारांनी पंतप्रधान कार्यालयाला एखादे पत्र पाठवून दिले की त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर मिळते मात्र या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे पंतप्रधान कार्यालयाला 60 हजारांहून अधिक पत्रे पाठवून देखील त्याबाबत कोणत्याही प्रकारचे उत्तर अद्याप देण्यात आलेले नाही. यावरून पंतप्रधान कार्यालयाकडून देखील मराठी भाषिकांबाबत दुजाभाव केला जात असल्याचे स्पष्ट होते.

लोकांनी निवडून दिलेल्या खासदारांना पंतप्रधान कार्यालयातून त्यांच्या भाषेत माहिती व शुभेच्छा पत्र पाठवली जातात. काही दिवसांपूर्वीच बेळगावच्या खासदारांना देखील कन्नडमधून मधून शुभेच्छा पत्र उपलब्ध झाले आहे. मात्र सीमाप्रश्न सुटावा यासाठी खानापूर तालुका युवा समितीतर्फे हजारो पत्र पाठवण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यानुसार ऑगस्ट क्रांती दिन ते 15 ऑगस्ट पर्यंत हजारो पत्रे पंतप्रधान कार्यालयाला पाठविण्यात आली.

यापैकी एकाही पत्राला उत्तर देण्यात आलेले नाही काही कार्यकर्त्यांनी रजिस्टर करून पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठविले होते. मात्र पोस्ट कार्ड प्रमाणेच रजिस्टर करून पाठवण्यात आलेल्या पत्रानाही उत्तर देण्यात आलेले नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त होत असून बेळगाव, खानापूर आदी भागात मराठी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून देखील त्यांना त्यांच्या भाषेत परिपत्रके किंवा माहिती दिली जात नाही उलट मराठी कागदपत्रांची मागणी करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल केले जातात.

भाषावार प्रांतरचना करताना केंद्र सरकारने सीमा भागातील लाखो लोकांवर अन्याय केला हा अन्याय दूर करण्याची मागणी सातत्याने मराठी भाषिकांतून होत असते. त्याकडे नेहमीच केंद्र सरकारकडून दुर्लक्ष होत असते. सीमाभागातील युवकांनी मोठ्या आशेने पंतप्रधान कार्यालयाला अधिक प्रमाणात पत्रे पाठवून प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मात्र पत्राला उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे पंतप्रधान कार्यालय देखील फक्त आपल्याच पक्षांच्या लोकांनी पाठविलेल्या पत्राला उत्तर देते का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठविण्यात आल्यानंतर उत्तर येईल अशी अपेक्षा होती. जी पत्रे रजिस्टर करून पाठवली होती ती पत्रे 28 ऑगस्टला पंतप्रधान कार्यालयात पोहोचली होती. मात्र त्यानंतर दोन महिने झाले तरी अद्याप उत्तर आलेले नाही. पंतप्रधान कार्यालयाकडून अशी अपेक्षा नव्हती.

- धनंजय पाटील अध्यक्ष खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : दादाची आस्थेने विचारणा! गावात सगळ्यांनी जेवण केलं का? ‘चानकी’ गावासाठी ‘दादा’ ठरले देवदूत

Ajit Pawar Death News LIVE Updates : उद्धव ठाकरे बारामतीला रवाना, पवार कुटुंबियांना भेटणार

Narayangaon News : संजय काय काम आणले; असे प्रेमाने म्हणणाऱ्या दादांच्या या शब्दाला मी कायमचा मुकलो

Ajit Pawar: अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीला पोहोचल्यावर शरद पवारांनी लोकांना काय विचारलं? वाचून डोळे पाणावतील...

Ajit Pawar: नियतीचा योगायोग! ज्या घड्याळानं सत्ता मोजली, राजकारणात नाव दिलं; त्याच घड्याळानं अजितदादांची शेवटची ओळख पटवली

SCROLL FOR NEXT