पेरणी sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : ७.५२ लाख हेक्टरमध्ये होणार पेरणी

यंदाच्या खरीप हंगामात ३५,९७८ हेक्टरची पडणार भर

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : यंदा मॉन्सूनपूर्वीच वळीव पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्याने जिल्ह्यात पेरणीचे क्षेत्र वाढणार आहे. कृषी खात्याच्या अंदाजानुसार, यावर्षी खरीप हंगामात ३५,९७८ हेक्टर प्रदेशाची भर पडणार आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात ७.१६ लाख हेक्टर प्रदेशात पेरणी केली जाते. मात्र, यावर्षी ७.५२ लाख हेक्टर प्रदेशात पेरणी होण्याची शक्यता आहे.

दरवर्षी अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तरीही मागील दोन वर्षांत खरीप आणि रब्बी हंगामात पाऊस होत असल्यामुळे ३६.२ टक्क्याने पेरणीचे क्षेत्र वाढत आहे. यंदा मे महिन्यात आतापर्यंत सरासरी ३०.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी मशागतीचे काम हाती घेतले आहे. तसेच पेरणीसाठी बियाणे आणि रासायनिक खतांचीही खरेदी केली जात आहे. मागील चार वर्षांपासून जरी पेरणीचे क्षेत्र वाढत असले, तरी अवेळी पाऊस, हवामानात सातत्याने होणारे बदल या कारणांमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट दिसून आली आहे. तरीही यावर्षी जिल्ह्यात शेंगा, सूर्यफूल व सोयाबीन या पिकांची पेरणी वाढणार आहे.‌

मागील वर्षी जिल्ह्यातील ३५ उपतहसील विभागात ५२.०९ हजार हेक्टर प्रदेशात मूग, २०.७२ हजार हेक्टरमध्ये शेंगा, ३६.२५ हजार हेक्टर क्षेत्रात सूर्यफुल, १.१७ लाख हेक्टरमध्ये मका, ९८.२८ हजार हेक्टर प्रदेशात सोयाबीन आणि इतर कडधान्यांचे उत्पादन घेण्यात आले होते. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ऊस लागवड वगळता कडधान्य, तेलबिया आणि कापसाचे उत्पादन ४,२७,९५८ हेक्टर प्रदेशात घेतले जाणार असल्याचा अंदाज कृषी खात्याने वर्तविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

'मला रक्ताच्या उलट्या…' प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोटामुळे सिनेसृष्टीतून ब्रेक, म्हणाला...'काळी जादू अन्..'

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

SCROLL FOR NEXT