बेळगाव sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : महापालिकेतही आता कमिशनराज

आयुक्तांकडे तक्रार, आकडा सांगताच बोलती बंद

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव: महापालिकेच्या एका ठेकेदाराने आरोग्य विभागातील अधिकाऱ्याला कमिशन दिल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे महापालिकेतील कमिशन राज चर्चेत आले आहे. विशेष म्हणजे ठेकेदाराने तक्रार केली त्यावेळी संबंधित अधिकारीही आयुक्तांच्या कक्षात उपस्थित होता. ठेकेदाराने अधिकाऱ्याला दिलेल्या कमिशनचा आकडाच सांगितल्याने आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्याची बोलतीच बंद झाली.

दरम्यान, कोणत्याही अधिकाऱ्याला एक रुपयाही कमिशन देण्याची गरज नसल्याचे आयुक्तांनी ठेकेदाराला सांगितले. मात्र, आयुक्त कक्षातील या घटनेची चर्चा संपूर्ण महापालिकेत सुरु आहे. कमिशन घेणारा अधिकारीही आता आयुक्तांच्या रडारवर आला आहे. सफाई ठेकेदारांकडून पैसे जमा करुन घेवून शहरातील आणखी एका ठेकेदाराकडे दिल्याचे महापालिकेतील प्रकरण गेल्या तीन महिन्यांपासून गाजत आहे. त्यानंतर आता हे नवे प्रकरण बाहेर आले आहे. आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याचा एका ठेकेदाराला आयुक्तांचे नाव सांगून भीती घालणे व कमिशन वसूल करण्याचा त्याचा प्रयत्न होता. त्या ठेकेदारानेही आयुक्तांची भेट घेण्याचे ठरविले.

आयुक्त कक्षात गेल्यानंतर त्या अधिकाऱ्याने सफाई कामगारांना कामावरुन कमी केल्याची ठेकेदाराविरोधात तक्रार केली. आयुक्तांनी याबाबत जाब विचारताच ठेकेदाराने संबंधित अधिकाऱ्याला दरमहा कमिशन द्यावे लागत असल्याचे सांगत आतापर्यंत दिलेल्या कमिशनचा आकडाही सांगितला. अधिकाऱ्याला कमिशन द्यावे लागले तर जास्त कामगार नियुक्त कसे करता येतील, असा सवाल आयुक्तांनाच विचारला. त्यावर आयुक्त निरुत्तर झाले. शेवटी कोणालाही कमिशन न देता नियमानुसार सफाई कामगार नियुक्त करुन स्वच्छतेचे काम करण्याचा सल्ला दिला. शिवाय कोणी कमिशन किंवा पैसे मागितल्यास थेट आपल्याकडे तक्रार करण्यास सांगितले. यामुळे एका ठेकेदाराची समस्या सुटली, पण अन्य ठेकेदारांचे काय? अशी चर्चा सुरु झाली आहे.

लेखी तक्रार टाळण्यासाठी प्रयत्न

४० टक्के कमिशन प्रकरणात बेळगावातील ठेकेदार संतोष पाटील यांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री के. एच. ईश्‍वराप्पा यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर बंगळूर महापालिका व अन्य काही शासकीय संस्थांमधील कमिशनची प्रकरणे उघडकीस आली. आता बेळगाव महापालिकेतील कमिशनचे प्रकरण बाहेर आले आहे. अर्थात त्या ठेकेदाराने यासंदर्भात लेखी तक्रार केलेली नसली तरी त्याने लेखी तक्रार करु नये यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

SCROLL FOR NEXT