पश्चिम महाराष्ट्र

बेळगावात महापालिकेवर भगवा फडकवा; खासदार संजय राऊतांचं आवाहन

अमृत वेताळ

शिवसैनिक व तमाम मराठी भाषिकांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली एकत्र येऊन बेळगाव महापालिकेवर भगवा फडकवा

बेळगाव : बेळगावची मानबिंदू असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत (belgaum election 2021) मोठ्या संख्येने मराठी भाषिक नगरसेवक निवडून आले पाहिजेत. बेळगाव महापालिकेवर मराठी भाषकांचे वर्चस्व अबाधित राहिले पाहिजे. यासाठी शिवसैनिक व तमाम मराठी भाषिकांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली एकत्र येऊन बेळगाव महापालिकेवर भगवा फडकवा, असे आवाहन खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केले आहे.

बेळगावच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मुंबई (mumbai) येथे खासदार संजय राऊत, शिवसेनेचे सचिव आणि खासदार अनिल देसाई तसेच महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई (subhash desai) यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान बेळगावच्या शिवसैनिकांनी तोंडावर आलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या (belgaum munciple corporation) निवडणुकीसंदर्भात खासदार संजय राऊत आणि अनिल देसाई यांना माहिती देत सविस्तर चर्चा केली.

यावेळी संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र एकीकरण समिती (maharashtra ekikaran samiti) तसेच बेळगावातील तमाम मराठी संघ संस्थांनी एकत्र येऊन महापालिकेवर सत्ता प्रस्थापित करणे महत्त्वाचे आहे. महापालिकेच्या निवडणुकीत तमाम मराठी भाषिकांनी एकदिलाने काम करणे आवश्यक आहे. याकामी शिवसैनिकांनीही पुढाकार घेत आपली ताकद पणाला लावली पाहिजे, असे आवाहन खासदार संजय राऊत आणि मंत्री अनिल देसाई यांनी केले.

या भेटीदरम्यान शिवसेनेचे बेळगाव उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक दिलीप बैलुरकर, तालुकाप्रमुख सचिन गोरले, चंद्रकांत कोंडुस्कर, प्रकाश राऊत, विश्वनाथ येळ्ळूरकर, पिराजी शिंदे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT