Belgaum Municipal Corporation sakal
पश्चिम महाराष्ट्र

Belgaum News : महापौरांची गोची; ‘मराठी’च्या निर्णयावरून सत्ताधाऱ्यांत मतभेद

महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत महापौर शोभा सोमणाचे यांनी पुढील बैठकीची नोटीस मराठी, कन्नड व इंग्रजी अशा तिन्ही भाषेत देण्याचा आदेश बजाविला आहे.

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - सर्वसाधारण व स्थायी समिती बैठकीची नोटीस मराठीसह तिन्ही भाषेत देण्याच्या महापौर शोभा सोमणाचे यांच्या निर्णयावर सत्ताधारी भारतीय जनता पक्षातच मतभेद निर्माण झाल्याची माहिती मिळाली आहे. या निर्णयाला भाजपच्या कन्नड भाषिक नगरसेवकांनी विरोध केला आहे. त्यामुळे पहिल्या सर्वसाधारण बैठकीत झालेल्या या निर्णयाची अंमलबजावणी करताना महापौरांची दमछाक होणार आहे.

शुक्रवारी (ता. २१) झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत महापौर शोभा सोमणाचे यांनी पुढील बैठकीची नोटीस मराठी, कन्नड व इंग्रजी अशा तिन्ही भाषेत देण्याचा आदेश बजाविला आहे. बैठकीत सत्ताधारी भाजप तसेच विरोधी गटातील मराठी नगरसेवकांनी या निर्णयाचे स्वागत केले.

बैठकीला उपस्थित कन्नड नगरसेवकांनी त्यावेळी या निर्णयाला विरोध केला नाही, पण बैठकीनंतर सत्ताधारी गटातील कन्नड नगरसेवकांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे सत्ताधारी गटात मराठी व कन्नड असे दोन गट तयार झाले आहेत. महापौर निवडणुकीतही सत्ताधारी गटात भाषिक गट तयार झाले होते. महापौर व उपमहापौर ही दोन्ही पदे मराठी भाषिकांना मिळाल्यामुळे कन्नड नगरसेवक नाराज झाले होते. आता त्याची पुनरावृत्ती झाली आहे.

महापालिकेत यावेळी भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळाली असली, तरी त्यात मराठी नगरसेवकांची संख्या जास्त आहे. विरोधी गटातही मराठी नगरसेवक आहेत. त्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीचे कामकाज मराठी भाषेतही चालते. महापालिकेत याआधी महाराष्ट्र एकीकरण समितीचे वर्चस्व होते, त्यामुळे महापालिकेत मराठी भाषेचे अस्तित्व टिकून राहिले.

महापालिकेच्या बैठकीची नोटीस व विषयपत्रिका आधीपासून कन्नड व मराठी अशा दोन्ही भाषेत दिली जाते. मात्र, भाजपची सत्ता आल्यावर मराठी भाषेला डावलण्यात आले. पहिल्या सर्वसाधारण बैठकीची नोटीस केवळ कन्नड भाषेत देण्यात आली. त्याआधीही अंदाजपत्रक पूर्वतयारी व अंदाजपत्रक बैठकीची नोटीस केवळ कन्नड भाषेतच देण्यात आली होती.

अंमलबजावणीचे आव्हान

मराठी भाषेत नोटीस देण्याची मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांनी याआधी केली होती. शुक्रवारी (ता. २१) झालेल्या सर्वसाधारण बैठकीच्या प्रारंभी भाजपचे नगरसेवक नितीन जाधव व त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी पुन्हा ही मागणी केली. महापौरांनी ही मागणी मान्य केली खरी, पण आता अंमलबजावणी करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT