belgaum municipal corporation reservation declared in belgaum election decision done 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव महापालिकचे तात्कालिक प्रभाग आरक्षण जाहीर

मल्लिकार्जुन मुगळी

बेळगाव : राज्यशासनाकडून बेळगाव महापालिकेच्या 58 प्रभागांचे तात्कालीक आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. 2018 सालच्या प्रभाग पुनर्रचनेनुसारच हे प्रभार आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता महापालिका निवडणूक होणार हे नक्की झाले आहे. महापालिका निवडणूकीच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या विभागीय पीठासमोर याचिका दाखल करण्याच्या हालचाली सुरू असतानाच आरक्षण जाहीर करून शासनाने धक्का दिला आहे. या आरक्षणावर आता आक्षेप मागविण्यात येणार आहेत.

आक्षेपांची पडताळणी करून लवकरच अंतिम प्रभाग आरक्षण जाहीर केले जाणार आहे. 16 जानेवारी रोजी ही आरक्षण अधिसूचना जारी करण्यात आले आहे. प्रत्येक प्रभागासाठी एक आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. पंधरा दिवसात या आरक्षणार आक्षेप नोंदवावे लागणार आहे. आक्षेप लेखी स्वरूपात व कागदपत्रांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करावे लागणार आहेत. नगरविकास खात्याचे सचिव ए. विजयकुमार यांनी ही अधिसूचना काढली आहे. 

बेळगावातील 58 प्रभागांचे आरक्षण खालीलप्रमाणे प्रभाग क्रमांक - आरक्षण

  • 1- इतर मागास अ महिला
  • 2-सामान्य
  • 3-इतर मागास ब महिला
  • 4-सामान्य
  • 5- सामान्य महिला
  • 6- इतर मागास अ
  • 7-इतर मागास ब
  • 8-सामान्य
  • 9-इतर मागास अ महिला
  • 10-इतर मागास ब महिला
  • 11-सामान्य
  • 12-इतर मागास अ
  • 13-सामान्य महिला
  • 14-इतर मागास ब
  • 15-इतर मागास अ महिला
  • 16-सामान्य
  • 17-अनुसूचीत जाती महिला
  • 18-सामान्य
  • 19- इतर मागास अ
  • 20-सामान्य महिला
  • 21-इतर मागास अ महिला
  • 22-सामान्य
  • 23-सामान्य
  • 24-इतर मागास अ
  • 25-सामान्य महिला
  • 26-इतर मागास अ महिला
  • 27-सामान्य
  • 28-अनुसूचित जाती
  • 29- सामान्य
  • 30- इतर मागास अ
  • 31-इतर मागास अ महिला
  • 32-अनूसूचित जाती
  • 33-सामान्य महिला
  • 34-सामान्य
  • 35-अनुसूचित जाती महिला
  • 36-सामान्य
  • 37-सामान्य महिला
  • 38-इतर मागास अ
  • 39-सामान्य
  • 40-इतर मागास अ महिला
  • 41-सामान्य
  • 42-इतर मागास अ
  • 43-सामान्य महिला
  • 44-सामान्य
  • 45-अनुसूचित जमाती महिला
  • 6- सामान्य
  • 47- सामान्य महिला
  • 48-इतर मागास अ
  • 49-सामान्य महिला
  • 50-सामान्य महिला
  • 51-अनुसूचित जाती
  • 52-सामान्य महिला
  • 53- अनुसूचित जमाती
  • 54-सामान्य महिला
  • 55-सामान्य महिला
  • 56-सामान्य महिला
  • 57-सामान्य महिला
  • 58-सामान्य महिला
     

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाण्यात चाललंय काय? आंतरजातीय विवाहामुळे कुटुंबावर बहिष्कार; कौटुंबिक, व्यावसायिक संबंध ठेवण्यास बंदी

IPL 2026, RR vs MI: मुंबई इंडियन्सने 'त्या' मॅचविनर खेळाडूला राजस्थान रॉयल्सविरुद्ध का खेळवलं नाही? कोचने केला मोठा खुलासा

2,20,00,00,000 इतकी आहे सनी देओलची संपत्ती, मुंबईपासून UK पर्यंत आहेत आलिशान घरं, 100 एकर जमीन आणि बरंच काही

भाईला 'बाई' करू, पुणे डीसीपींचे अजब विधान; लक्षात येताच तिथंच स्पष्ट केलं

BEST Bus: कर्मचारी कमी; मुंबईची लाइफलाइन धोक्यात! बेस्ट बस कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय वाढणार? मोठा निर्णय लवकरच

SCROLL FOR NEXT