voting 
पश्चिम महाराष्ट्र

लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी वर-वधुने बजावलं लोकशाहीचं कर्तव्य; मुंडावळे बांधून केलं मतदान

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : आधी लगीन कोंढाण्याचे..या छत्रपती शिवरायांच्या वीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या कर्तव्यनिष्ठेप्रमाणेच बेळगाव परिसरातील वर-वधुनी लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी मतदानाचे कर्तव्य पार पाडून लोकशाहीप्रति असलेली निष्ठा दाखवून दिली.

लग्न सोहळा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा भाग असतो. काहींनी मतदानादिवशीच लग्न सोहळा आयोजित केला होता. तर काहींनी दोन महिन्यांपूर्वीच ही तारीख ठरविली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी हा दिवस खास ठरला. विधानसभेसाठी बुधवारी (ता. १०) मतदान झाले.

या दिवशी अनेकांनी आपल्या लग्नाचे नियोजन आखले होते. त्यामुळे त्यांना पहिला मतदान व त्यानंतर लग्न समारंभासाठी पोचावे लागले. कंग्राळी येथील वराने आपल्या लग्नादिवशीच आपले कर्तव्य पार पाडले. वर-वधुंसाठी हा दिवस कायम स्मरणात राहण्यासारखा ठरला आहे. (Latest Marathi News)

वर-वधु मुंडावळ्या, फेटा, पोशाख परिधान केलेल्या स्थितीत मतदान केंद्रावर मतदान केले. त्यामुळे राष्ट्र कर्तव्य व आपल्या मतदानाच्या मूलभूत अधिकाराला प्रथम कर्तव्य समजत एक वेगळे मूर्तिमंत उदाहरण समाजासमोर उभे केले. (Latest Marathi News)

यामुळे परिसरातून नवरदेव व कुटुंबियांचे कौतुक होत आहे. १० रोजी तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनीच मतदानाचा हक्क बजावला. पण विशेष लक्ष गेलं ते मतदान करण्यासाठी आलेल्या वर-वधूकडे. नटून-थटून थेट लग्नाआधी मतदानकेंद्रावर आल्याचं पाहायला मिळालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT