Digital_Transcript sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : ऑनलाईन उतारे मिळण्यात अडचणी

सर्व्हर डाउनचा त्रास; ई-स्वत्तू एका उताऱ्यासाठी दोन ते तीन महिने प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : ग्रामपंचायतीमधून गावठाण ऑनलाईन उतारे (ई-स्वत्तू ) मिळण्यात अडचणी येत आहेत. सर्व्हर डाउनचा त्रास ग्रामीण भागातील लोकांना बसू लागले असून, गृहकर्ज घेणाऱ्यांना कर्ज मिळणे अवघड ठरले आहे. अनेक ग्रामपंचायतींकडून सर्व्हर डाउन असल्याचे सांगून उतारे देण्यास टाळाटाळ केली जात असून, एका उताऱ्यासाठी दोन ते तीन महिने प्रतीक्षा करावी लागत आहे.‌

शहराजवळ असणाऱ्या ग्रामपंचायतीनी सर्व्हे क्रमांकावर असलेल्या भूखंडांनाही गावठाणचे ऑनलाईन उतारे दिल्याने शासनाने यापूर्वी इ-स्वत्तू संकेतस्थळ काही दिवसांसाठी बंद केले होते. मागील वर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लॉगिन खुले केले होते. पण, त्यानंतर अनेक ग्रामपंचायतींनी हेच निमित्त पुढे करीत सर्व्हर डाउनची समस्या असल्याचे सांगत उतारे देण्यास विलंब करीत आहेत.‌ ग्रामपंचायतींमध्ये घरांची नोंदणी करण्याचे काम ठप्प झाले आहे. इ-स्वत्तू संकेतस्थळ ग्रामीण भागात जनतेची डोकेदुखी ठरू लागला आहे.

ग्रामीण भागात यापूर्वी घरांची नोंदणी मॅन्युअल पद्धतीने केली जात होती. २०१४ मध्ये शासनाने ग्रामीण भागातील घरांची नोंदणी डिजिटल पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. यामुळे शासनाच्या निकषांनुसार डिजिटल उतारे मंजूर केले जात आहेत. तर मॅन्युअल उतार देण्याची पद्धत देखील रद्द करण्यात आली. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये आता घरांची नोंद डिजिटल पद्धतीनेच केली जात आहे. त्यासाठी आधी ग्रामपंचायतीकडे रितसर अर्ज करावा लागतो. त्यानंतर ग्रामपंचायतीकडून पाहणी करून त्याची माहिती इ-स्वत्तूवर दाखल केली जाते. नंतर ग्रामपंचायतकडून डिजिटल उतारा मंजूर करण्यात येतो. पण सर्व्हरडाऊन असल्याचे सांगत उतारा देण्यास टाळाटाळ केली जात आहे.‌

घरबांधणीत अडचण

बँकेतून घरबांधणीसाठी गृहकर्ज हवे असल्यास उतारा देणे आवश्यक आहे. शासनाच्या गृहबांधणी योजनेसाठीही उतारा द्यावा लागतो. पण, उतारे मिळत नसल्याने समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनेकांचे घरबांधणीचे स्वप्नच अधुरे ठरले आहे; तर इतर कारणासाठी घरावर कर्ज घेणाऱ्यांनाही कर्ज मिळेनासे झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आज मतदान! मोबाईल घेऊन जाऊ नका, फोटो-व्हिडिओ काढल्यास दाखल होईल गुन्हा; एकच बॅलेटवर दोन्ही उमेदवार, मतदान कसे करायचे? ‘हे’ ओळखपत्र असेल तरी करता येईल मतदान

बापरे! दिव्या शिंदेला बिग बॉसने काढलं घराबाहेर, जीवे मारण्याची दिली धमकी, नक्की काय घडलं?

उजनी धरणात 113 TMC पाणी! भीमा नदीत 15 फेब्रुवारीपर्यंत पाणी तर शेतीचे आवर्तन 28 फेब्रुवारीपर्यंत असणार; पुढे ‘या’ महिन्यात सुटणार दोनदा पाणी, वाचा...

Thalapathy Vijay News : मद्रास उच्च न्यायालयाकडून थलापती विजयला आणखी एक धक्का; दीड कोटींचा दंड भरावा लागणार

U19 World Cup: पुणेकराचं मार्गदर्शन अन् टीम इंडियाने जिंकला वर्ल्ड कप! भारतीय क्रिकेटचे भविष्य घडवणारा मराठमोळा प्रशिक्षक

SCROLL FOR NEXT