paschim maharashtra sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षण खात्याकडून नियोजन

विद्यार्थ्यांना शिकवण्याची सूचना लवकरच शिक्षण खात्याकडून केली जाणार आहे.

मिलिंद देसाई

बेळगाव : शाळा विलंबाने सुरू झाल्याने कमी दिवसात सर्व अभ्यासक्रम शिकवणे शक्य हॊणार नसल्याने शाळांमध्ये अधिक तास घेऊन विद्यार्थ्यांना शिकवण्याची सूचना लवकरच शिक्षण खात्याकडून केली जाणार आहे.

शिक्षण मंत्री एन. बी .नागेश यांनी शाळा विलंबाने सुरू झाल्याने अभ्यासक्रम पूर्ण करणे अशक्य असल्याचे मत व्यक्त करीत याबाबत नियोजन करण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्यानुसार कशाप्रकारे अधिक तास घेण्यात यावेत याबाबतची माहिती लवकरच शाळांना दिली जाणार असून गेल्या वर्षी शिक्षण खात्याने अभ्यासक्रमात 30 टक्क्यांची कपात केली होती. परंतु गेल्या वर्षी शाळा फक्त काही दिवसच सुरू होत्या त्यामुळे अभ्यासक्रम शिकवणे कठीण गेले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी लवकर शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या वर्षी अभ्यासक्रमात कपात न करता अधिक तास घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

शाळा विलंबाने सुरू झाल्या तरी परीक्षा वेळेत पार पडाव्यात याकडे शिक्षण खात्याचे लक्ष असून मार्च महिन्यापर्यंत सर्व अभ्यासक्रम पूर्ण करून पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे तर दहावीची परीक्षा मे महिन्यात पार पडणार असून या परीक्षेचा निकाल जून महिन्यात जाहीर केला जाणार आहे. मात्र परीक्षा पूर्वी सर्व अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना कसरत करावी लागणार असून दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस शाळा सुरू होतात त्यानंतर शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर केले जाते त्यानुसार विद्यार्थ्यांना शिकवणे सोपे होते. मात्र सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे शाळा सुरू होण्यास विलंब झाल्याने शैक्षणिक वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता अधिक तास घेऊन विद्यार्थ्यांना शिकविल्यास त्याचा विद्यार्थ्यांना चांगला लाभ होणार आहे.

अभ्यासक्रमात कपात होण्याची शक्यता अतिशय कमी आहे. त्यामुळे अधिक तास घेऊन विद्यार्थ्यांना शिकवावे लागणार आहे. त्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.

ए बी पुंडलिक, जिल्हा शिक्षणाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT